जर तुम्ही मोबाईलचं दर महिन्याला किंवा तीन महिन्यांचं रिचार्ज करत असाल आणि तुम्हाला यातून सुटका हवी असेल तर रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाचे अनेक स्वस्त प्लॅन बाजारात उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये वर्षभराची व्हॅलिडिटी देण्यात येते. तुम्हाला एअरटेल, व्हाडाफोन-आयडिया आणि जिओच्या अशा वर्षभरासाठी असलेल्या प्लॅनची माहिती देत आहोत ज्याचा खर्त १२५ रूपयांपेक्षाही कमी आहे. या प्लॅनसोबत अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि अन्य दुसरे बेनिफिट्सही मिळतात.
एअरटेल
एअरटेलच्या ३६५ दिवसांचा एक प्लॅन १४९८ रूपयांचा आहे. या प्लॅनचं रिचार्ज केलं तर तुम्हाला महिन्यासा १२४.८ रूपये इतका खर्च येतो. जर तुम्ही यातील प्लॅन्सच्या बेनिफिट्सबद्दल म्हटलं तर यावर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येते. तसंच यासोबत २४ जीबी डेटाही मिळतो. याव्यतिरिक्त ग्राहकाना ३६०० एसएमसदेखील देण्यात येतात. यासोबतच Airtel Xtreme प्रिमिअम आणि विंक म्युझिकचंदेखील सबक्रिप्शन देण्यात येतं.
व्होडाफोन-आयडिया
व्होडाफोन आयडियादेखील वर्षभराचे प्लॅन ऑफर करतं. त्यातील एका प्लॅनची किंमत १४९९ रूपये इतकी आहे. या प्लॅनसोबत ३६५ रूपयांची वैधता मिळते. याचा प्लॅनचा एका महिन्याचा खर्च १२४.९१ इतका होतो. या प्लॅनसोबतच सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो. याव्यरिक्त ३६०० एसएमएस आणि २४ जीबी डेटाही देण्यात येतो. तसंच या प्लॅनबरोबर Vi Movies आणि TV चं सबस्क्रिप्शन देण्यात येतं.
रिलायन्स जिओ
रिलायन्स जिओचा १,२९९ रूपयांचा प्लॅन जवळपास वर्षभराच्या व्हॅलिडीटीसह येतो. यात ११ महिन्यांची वैधता मिळते. तसंच या प्लॅनचा महिन्याचा खर्च ११८ रूपये इतका पडतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना २४ जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, ३६०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन मिळतं.