Lokmat Money > बिझनेस न्यूज > Reliance Jio : २४ जीबी डेटा, ३३६ दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या बेस्ट प्लॅन्स

Reliance Jio : २४ जीबी डेटा, ३३६ दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या बेस्ट प्लॅन्स

किंमत १२९ रूपयांपासून प्लॅन सुरू 

By जयदीप दाभोळकर | Published: January 26, 2021 02:24 PM2021-01-26T14:24:06+5:302021-01-26T14:26:44+5:30

किंमत १२९ रूपयांपासून प्लॅन सुरू 

reliance jio news know more affordable plans with data and unlimited calling starting from rupees 129 | Reliance Jio : २४ जीबी डेटा, ३३६ दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या बेस्ट प्लॅन्स

Reliance Jio : २४ जीबी डेटा, ३३६ दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या बेस्ट प्लॅन्स

Highlightsकिंमत १२९ रूपयांपासून प्लॅन्स सुरू मोफत कॉलिंग, एसएमस असे अनेक फायदे

रिलायन्स जिओ ही दूरसंचार कंपनी आपल्या ग्राहकांसाठी दीर्घ कालावधीचे अनेक प्लॅन्स ऑफर करते. कंपनीकडे सध्ये अनेक प्लॅन्स आहेत ज्यामध्ये मोफत कॉलिंग आणि डेटासह अन्य फायदेही मिळत आहेत. तर अनेकदा युझर्सना कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स आणि ऑफर्स देणारे प्लॅन्स हवे असतात. यासाठीच आम्ही तुम्हाला रिलायन्स जिओच्या काही प्लॅन्सबद्दल माहिती देणार आहोत. यामध्ये डेटा आणि जवळपास वर्षभराची व्हॅलिडिटीही देण्यात येत आहे. 

१२९ रूपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये ग्राहकाला एकूण २ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच या प्लॅनची वैधता २८ दिवसांची असणार आहे. या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ देण्यात येतो. याव्यतिरिक्त ग्राहकांना दररोज ३०० एसएमस आणि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. 

३२९ रूपयांचा प्लॅन

३२९ रूपयांचा हा प्लॅन ८४ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये एकून १ हडार एसएमस आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभही देण्यात येत आहे. या प्लॅनमध्ये एकून ६ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच यासह ग्राहकांना मोफत जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही मिळतं. 

१२९९ रूपयांचा प्लॅन

जिओच्या १२९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३३६ दिवसांची वैधता मिळते. तसंच या प्लॅनसोबत एकूण २४ जीबी डेटा देण्यात येतो. यासोबतच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, ३,६०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही देण्यात येत आहे. 

Web Title: reliance jio news know more affordable plans with data and unlimited calling starting from rupees 129

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.