रिलायन्स जिओच्या बाजारातील एन्ट्रीनंतर सर्वच दूरसंचार कंपन्यांचे धाबे दणाणले होते. सध्या रिलायन्स जिओकडे अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. परंतु अनेकदा लोकांना काही प्लॅन निवडण्यात समस्या येत असतात. आज अशा प्लॅनबद्दल माहिती घेऊया ज्यात केवळ १ रूपया देऊन २८ दिवसांची अतिरिक्त वैधता आणि ५६ जीही अतिरिक्त डेटा मिळवता येईल. जाणून घेऊया या एका रूपयात किती फायदा होईल. रिलायन्स जिओच्या ५९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच पूर्ण पॅकमध्ये ११२ जीबी हायस्पीड डेटा मिळतो. जसा हायस्पीडे डेटा संपेल तसा हा स्पीड 64kbps इतका होती. या प्लॅन सोबत कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंग, १०० एसएमएस याव्यतिरिक्त जिओ अॅप्सचंदेखील सबस्क्रिप्शन मिळतं. कोणत्याही अतिरिक्त चार्जेससह १ वर्षाचं डिज्नी + हॉटस्टारचं सबक्रिप्शनही यात देत येतं. या प्लॅनची वैधता ५६ दिवसांची असते. तर दुसरीकडे रिलायन्स जिओच्या ५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा देण्यात येतो. या प्लॅनसोबत ग्राहकांना एकूण १६८ जीबी डेटा मिळतो. याव्यतिरिक्त अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शनही ग्राहकांना देण्यात येतं. या प्लॅनची वैधता ८४ दिवस आहे. काय आहे फरक ?१ रूपयाचा फरक असलेल्या या प्लॅनमध्ये डेटा आणि वैधतेतही फकत आहे. ५९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांची तर ५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता मिळते. दोन्ही प्लॅनमध्ये कॉलिंग अनलिमिटेड मिळतं. परंतु ५९८ रूपयांच्या प्लॅनमध्ये ११२ जीबी डेटा आमि ५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये १६८ जीबी डेटा मिळतो. केवळ १ रूपया अतिरिक्त खर्च करून ग्राहकांना ५६ जीबी अतिरिक्त डेटा आणि २८ दिवसांची अतिरिक्त व्हॅलिडिटी मिळते. ५९९ रूपयांच्या प्लॅनमध्ये १ वर्षासाठी डिज्नी+ हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन मिळणार नाही.
Reliance Jio : फक्त १ रुपया जास्त देऊन वाढेल २८ दिवसांची वैधता आणि मिळेल ५६ जीबी अतिरिक्त डेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 6:13 PM
पाहा कोणता आहे हा प्लॅन
ठळक मुद्देग्राहकांना मिळणार अतिरिक्त वैधता आणि डेटा