Lokmat Money > बिझनेस न्यूज > केवळ ७.५ रुपयांत Reliance Jio देतेय दररोज १ जीबी डेटा; अनिलिमिटेड कॉलिंग आणि अन्य बेनिफिट्स

केवळ ७.५ रुपयांत Reliance Jio देतेय दररोज १ जीबी डेटा; अनिलिमिटेड कॉलिंग आणि अन्य बेनिफिट्स

Cheap Reliance Jio Prepaid Plans : पाहूया या प्लॅन्समध्ये काय मिळतं विशेष.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 06:38 PM2022-03-08T18:38:06+5:302022-03-08T18:38:21+5:30

Cheap Reliance Jio Prepaid Plans : पाहूया या प्लॅन्समध्ये काय मिळतं विशेष.

Reliance Jio offers 1GB data per day for only Rs 7 5 Unlimited calling and other benefits know about rechage plans | केवळ ७.५ रुपयांत Reliance Jio देतेय दररोज १ जीबी डेटा; अनिलिमिटेड कॉलिंग आणि अन्य बेनिफिट्स

केवळ ७.५ रुपयांत Reliance Jio देतेय दररोज १ जीबी डेटा; अनिलिमिटेड कॉलिंग आणि अन्य बेनिफिट्स

Cheap Reliance Jio Prepaid Plans : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर करते. आम्ही तुमच्यासाठी कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अशा प्रीपेड प्लॅन्सची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये स्वस्त डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ मिळतो.

१४९ रुपयांचा प्लॅन
१ जीबी डेटा वापरणाऱ्यांसाठी कंपनी अनेक अफोर्डेबल प्लॅन्स ऑफर करत आहे. या प्लॅन्समध्ये युझर्सना फ्री कॉलिंग आणि अन्य बेनिफिट्सही मिळतात. १४९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा ऑफर केला जातो. त्याची वैधता २० दिवसांची आहे. यामध्ये दररोज ७.५ रुपये प्रमाणे युझर्सना डेटासोबतच अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं. 

१७९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओचा १७९ रुपयांचा प्लॅन २४ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा प्रमाणे २४ जीबी डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएससह १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारे अन्य बेनिफिट्सही मिळतात.

२०९ रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओचा २०९ रुपयांचा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये युझर्सना २०९ रुपयांमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये युझर्सना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन दिलं जातं.

Web Title: Reliance Jio offers 1GB data per day for only Rs 7 5 Unlimited calling and other benefits know about rechage plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.