Join us  

केवळ ७.५ रुपयांत Reliance Jio देतेय दररोज १ जीबी डेटा; अनिलिमिटेड कॉलिंग आणि अन्य बेनिफिट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 6:38 PM

Cheap Reliance Jio Prepaid Plans : पाहूया या प्लॅन्समध्ये काय मिळतं विशेष.

Cheap Reliance Jio Prepaid Plans : रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक प्रकारचे प्लॅन ऑफर करते. आम्ही तुमच्यासाठी कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये अशा प्रीपेड प्लॅन्सची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये स्वस्त डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ मिळतो.

१४९ रुपयांचा प्लॅन१ जीबी डेटा वापरणाऱ्यांसाठी कंपनी अनेक अफोर्डेबल प्लॅन्स ऑफर करत आहे. या प्लॅन्समध्ये युझर्सना फ्री कॉलिंग आणि अन्य बेनिफिट्सही मिळतात. १४९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये दररोज १ जीबी डेटा ऑफर केला जातो. त्याची वैधता २० दिवसांची आहे. यामध्ये दररोज ७.५ रुपये प्रमाणे युझर्सना डेटासोबतच अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन मिळतं. 

१७९ रुपयांचा प्लॅनरिलायन्स जिओचा १७९ रुपयांचा प्लॅन २४ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये ग्राहकांना दररोज १ जीबी डेटा प्रमाणे २४ जीबी डेटा मिळतो. यासोबतच अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएससह १४९ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारे अन्य बेनिफिट्सही मिळतात.

२०९ रुपयांचा प्लॅनरिलायन्स जिओचा २०९ रुपयांचा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये युझर्सना २०९ रुपयांमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये युझर्सना अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचं सबस्क्रिप्शन दिलं जातं.

टॅग्स :रिलायन्स जिओ