Join us

वेळेपूर्वीच Reliance Jio नं स्पेक्ट्रमचे फेडले ३०,७०० कोटी; वर्षाला होणार १२०० कोटींची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 10:06 AM

Reliance Jio : कंपनीला ही रक्कम भरण्यासाठी आर्थिक वर्ष २०३५ पर्यंत मुदत होती.

रिलायन्स जिओने (Reliance Jio) दूरसंचार विभागाला (DoT) ३०,७९१ कोटी रुपयांचे (व्याजासह) डिफर्ड स्पेक्ट्रम दायित्वाचे (deferred liability) प्रीपेड पेमेंट केलं आहे. रिलायन्स जिओनं यासंदर्भातील माहिती दिली. याशिवाय जिओने गेल्या वर्षी भारती एअरटेलकडून (Bharti Airtel) ५८५.३ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमही विकत घेतले.

दूरसंचार विभागाने (DoT) डिसेंबरमध्ये दूरसंचार कंपन्यांना (Telecom Companies) डिफर्ड स्पेक्ट्रम दायित्वांचे प्रीपेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या पेमेंटसह, रिलायन्स जिओने आता ट्रेडिंगच्या माध्यमातून २०१४-२०१५ मध्ये संपादन केलेल्या स्पेक्ट्रमसाठी संपूर्ण दायित्वांचं प्रीपेड पेमेंट केलं आहे.

जिओने २०१६ मध्ये घेतलेल्या स्पेक्ट्रमसाठी ऑक्टोबर महिन्यात प्रीपेमेंटचा पहिला हप्ता भरला होता. हे दायित्व आर्थिक वर्ष २०२३ पासून भरायचे होते आणि ते आर्थिक वर्ष वर्ष २०३५  पर्यंत अदा करता येणार होते. परंतु यावर ९.३-१०% वार्षिक दराने व्याज आकारले  गेले असते. दरम्यान, जिओच्या या प्रीपेमेंटमुळे प्रति वर्ष १,२०० कोटी रुपयांची बचत होईल.

टॅग्स :रिलायन्स जिओएअरटेल