रिलायन्स जिओ (Reliance Jio) सध्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक विशेष प्रीपेड प्लॅन्स (Prepaid Plans) ऑफर करते. जवळजवळ जिओचे सर्वच प्लॅन एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडिच्या (Vodafone-Idea) पॅकपेक्षा स्वस्त आहेत. अलीकडेच Jio ने त्यांच्या काही निवडक प्रीपेड प्लॅनमध्ये कॅशबॅक देण्यास सुरूवात केली आहे. जिओच्या कॅशबॅक प्लॅनच्या यादीमध्ये चार प्लॅन समाविष्ट आहेत. याची प्लॅन्सची किंमत 299 रुपये, 666 रुपये, 719 रुपये आणि 2999 रुपये आहेत. रिलायन्स जिओच्या या चार प्रीपेड प्लॅन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Jio 299 Plan299 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64 Kbps इतका होतो. या प्लॅनमध्ये एकूण 56GB डेटा देण्यात आला आहे. हा प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येत असून यात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल्सचा लाभही देण्यात येतो. एसएमएसबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस दिले जातात. इतर फायद्यांबद्दल सांगायचे झाल्यास, या प्लॅनमध्ये JioCinema, JioSecurity, JioTV आणि JioCloud चं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.
Jio 666 Plan666 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 64 Kbps इतका होतो. या प्लानमध्ये एकू 126GB डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनसोबत 84 दिवसांची वैधता मिळते. याशिवाय या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएस देण्यात येत असून यात अनलिमिटेड कॉलिंगचाही लाभ मिळतो. इतर बेनिफिट्सबद्दल सांगायचं झाल्यास यासोबत JioCinema, JioSecurity, JioTV आणि JioCloud चं सबस्क्रिप्शनही देण्यात येतं.
Jio 719 Plan719 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा मिळतो. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर 64 Kbps स्पीड मिळतो. या प्लानमध्ये एकूण 168GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनसोबत 84 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा लाभही देण्यात येतो. एसएमएसबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. याशिवाय या प्लॅनमध्ये JioCinema, JioSecurity, JioTV आणि JioCloud यांचं सबस्क्रिप्शनही मिळतं.
Jio 2999 Planरिलायन्स जिओचा 2,999 रुपयांचाही एक प्लॅन आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची असून या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा दिला जातो. म्हणजेच प्लॅनमध्ये एकूण 912.5GB डेटा उपलब्ध आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो आणि दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये Jio अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे.
JioMart Maha कॅशबॅक ऑफरया सर्व प्लॅनसह ग्राहकांना 20 टक्के कॅशबॅक मिळत आहे. हा कॅशबॅक ग्राहकांना त्यांच्या JioMart खात्यात दिला जातो. यानंतर, हा कॅशबॅक रिलायन्स रिटेल चॅनेलवर वापरला जाऊ शकतो. ऑफर अंतर्गत, तुम्ही JioMart वर किंवा रिचार्जवर 1,000 रुपये खर्च केल्यास तुम्हाला 200 रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल. तुम्ही ते JioMart वर किंवा तुमच्या पुढील रिचार्जवर किंवा रिलायन्स रिटेल चॅनेलद्वारे मिळवू शकाल.