Jio Rs 583 Vs Rs 533 Plan: या प्लॅन्सच्याकिंमतींमध्ये फारच कमी फरक आहे. यामध्ये कोणते फायदे दिले जात आहेत आणि यापैकी कोणते प्लॅन तुमच्यासाठी चांगले आहेत हे पाहूया.Jio Rs 583 Vs Rs 533 Plan: रिलायन्स जिओ अनेक रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते. यापैकी काही प्रीपेड पॅकची किंमत जवळपास सारखीच असते. यामुळे युझर्स त्यांच्यासाठी कोणता प्रीपेड प्लॅन उत्तम ठरेल याबद्दल खूप गोंधळून जातात. Jio 583 रुपये आणि 533 रुपये किंमतीचे दोन समान प्लॅन ऑफर करते. त्यांच्या किंमतींमध्ये फारच कमी फरक आहे. यामध्ये कोणते फायदे दिले जात आहेत आणि यापैकी कोणता प्लॅन तुमच्यासाठी चांगला आहे, हे आपण जाणून घेऊ.
583 रुपयांचा प्लॅन
या प्रीपेड पॅकमध्ये ग्राहकांना दररोज 1.5GB डेटा मिळतो. हा प्लान 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच युजर्सना एकूण 84GB डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलचा लाभही दिला जातो. त्याचबरोबर दररोज मोफत 100 एसएमएसही दिले जात आहेत. याशिवाय युझर्सना JioTV आणि JioCinema अॅप्सचाही फ्री अॅक्सेस मिळतो. जिओच्या या प्लॅनसह, तीन महिन्यांचे विनामूल्य Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनही दिलं जात आहे. याची किंमत 149 रुपये आहे.
533 रुपयांचा प्लॅन
या प्रीपेड पॅकमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो. हा प्लान 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. म्हणजेच यूजर्सना एकूण 112GB डेटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉलचा लाभही दिला जातो. त्याचबरोबर दररोज मोफत 100 एसएमएसही दिले जात आहेत. याशिवाय युझर्सना JioTV आणि JioCinema अॅप्सचाही फ्री अॅक्सेस मिळतो.
या दोन्ही प्लॅन्सची वैधता सारखीच असली तरी यात मिळणारा डेटा मात्र निराळा आहे. परंतु 583 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शनही दिलं जातं. जर तुम्हाला दररोज अतिरिक्त 500 एमबी डेटा आणि Disney+ Hotstar सबस्क्रिप्शन हवं असेल तर तुम्ही या प्लॅनसाठी जाऊ शकता. अन्यथा डेटा आणि कॉलिंगसाठी 533 रुपयांचा प्लॅनही तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो.