जिओने काही दिवसांपूर्वी डिस्ने + हॉटस्टार मोबाइल (Disney+ Hotstar Mobile) सबस्क्रिप्शनसह येणारे सर्वच प्लॅन्स काढून टाकले होते. प्रीपेड आणि पोस्टपेड पोर्टफोलिओमध्ये डिस्ने + हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शनसह येणारे सर्वच प्लॅन्स कंपनीनं काढले होते. परंतु असे दोन प्लॅन्स होते, ज्यामध्ये याचं प्रीमिअम सबस्क्रिप्शनही मिळत होतं.
जिओने आता आपल्या पोर्टफोलिओमधून हे प्लॅन्सदेखील काढून टाकले आहेत. म्हणजेच, Jio च्या ग्राहकांना यापुढे Disney+ Hotstar चे कोणतेही सबस्क्रिप्शन मिळणार नाही. कंपनीने डिस्ने + हॉटस्टारचे प्रीमियम सबस्क्रिप्शन उपलब्ध असलेल्या दोन्ही प्लॅन्स काढल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे कारण?जर तुम्हाला डिस्ने + हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन असलेले प्लॅन्स हवे असतील तर ग्राहकांना आता व्होडाफोन आयडिया किंवा एअरटेलच्या प्लॅन्सकडे वळावं लागेल. दरम्यान, काही रिपोर्ट्सनुसार कंपनी असं आपल्या इन हाऊस् ॲप्समुळे करत असल्याचं समोर आलं आहे. जिओ मोठ्या प्रमामात आपल्या कॉन्टेंट प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करत आहे. यासाठीच कंपनी आपल्या रिचार्ज प्लॅन्ससोबत याचं सबस्क्रिप्शन देत नसल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. सध्या ग्राहकांना जिओच्या रिचार्जसह जिओ ॲप्सचं कॉम्पिमेंट्री सबस्क्रिप्शनही मिळेल.
सध्या कंपनी कोणताही ओटीटी सबस्क्रिप्शन असलेला प्लॅन ऑफर करत नाही. तरी लवकरच एक नवा ओटीटी प्लॅटफॉर्म यासह जोडला जाऊ शकतो. Viacom 18 कडे पुढील पाच वर्षांसाठी आयपीएल स्ट्रिमिंगचेही अधिराप आहे. याचा मालकी हक्क आरआयएलकडेच आहे. सध्या कंपनीनं 1499 आणि 4199 रूपयांच्या प्लॅन्समधून डिस्ने + हॉटस्टारचं सबस्क्रिप्शन काढून टाकलं आहे.