रिलायन्स जिओ ही कंपनी सातत्यानं काही ना काही नवे प्लॅन्स घेऊन येत असते. सध्या कंपनीनं आणखी काही प्लॅन्स लाँच कले आहेत. कंपनीनं तीन नवे प्लॅन्स बाजारात आणल असून याची किंमत १,९९९ रूपये, १४९९ रूपये आणि ७४९ रूपये इतकी आहे. परंतु हे प्लॅन्स केवेळ जिओ फोन्ससाठीच आहेत. नुकतंच Reliance jio नं Jio phone 2021 ऑफरची घोषणा केली. या सर्व प्लॅन्समध्ये कंपनी ग्राहकांना अनलिमिटेड सेवा देत आहे. रिलायन्स जिओच्या ७४९ रूपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी ३३६ दिवस आहे. याचाच अर्थ २८ दिवसांप्रमाणे १२ सायकल्सपर्यंत या प्लॅनचा वापर करता येऊ शकतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रत्येक महिन्याला २ जीबी हायस्पीड डेटाही देण्यात येतो. यानंतर डेटाचा स्पीड ६४ केबीपीएस इतका होतो. याशिवाय ग्राहकांना जिओच्या ७४९ रूपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सेवाही देण्यात येते. तसंच प्रत्येक २८ दिवसांसाठी ५० एसएमएसही देण्यात येतात. सध्या या प्लॅनचा फायदा केवळ जिओ फोनच्या ग्राहकांनाच घेता येणार आहे. यामध्ये जिओ अॅप्सचंदेखील सबस्क्रिप्शन देण्यात येतं. तसंच हा प्लॅन जिओ ऑल इन वन कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आला आहे.
Reliance Jio : ७४९ रूपयांमध्ये मिळतेय एका वर्षाची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉल आणि डेटा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 5:00 PM
Reliance Jio : पाहा काय काय मिळतंय या प्लॅनमध्ये
ठळक मुद्देया प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड डेटाही देण्यात येत आहे.या प्लॅनची व्हॅलिडिटी ३३६ दिवसांची असेल.