Lokmat Money > बिझनेस न्यूज > Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन, ११२ जीबी डेटा, अनिलिमिटेड कॉलिंग; पाहा काय आहे खास

Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन, ११२ जीबी डेटा, अनिलिमिटेड कॉलिंग; पाहा काय आहे खास

जिओ आपल्या स्वस्त आणि पॉकेट फ्रेंडली प्लॅन्ससाठी ओळखली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 03:35 PM2023-01-01T15:35:12+5:302023-01-01T15:35:28+5:30

जिओ आपल्या स्वस्त आणि पॉकेट फ्रेंडली प्लॅन्ससाठी ओळखली जाते.

Reliance Jio s Awesome Plan 112 GB Data Unlimited Calling See what s special jio tv jio apps | Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन, ११२ जीबी डेटा, अनिलिमिटेड कॉलिंग; पाहा काय आहे खास

Reliance Jio चा जबरदस्त प्लॅन, ११२ जीबी डेटा, अनिलिमिटेड कॉलिंग; पाहा काय आहे खास

रिलायन्स जिओ ही कंपनी आपल्या स्वस्त आणि पॉकेट फ्रेंडली प्लॅन्ससाठी ओळखला जातो. जिओच्या प्लॅन्समध्ये कमी किंमतीत अधिक बेनिफिट्सही मिळतात. येथे तुम्हाला अशाच स्वस्त प्लॅनबद्दल सांगत आहोत जे ग्राहकांना दररोज 2GB डेटा देत आहे. याशिवाय जियोचा हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग, फ्री एसएमएस आणि अनेक ॲप्सचे सबस्क्रिप्शनही देत ​​आहे. ज्यांना अधिक डेटाची आवश्यकता आहे अशांसाठी जिओचा हा प्लॅन उत्तम आहे.

रिलायन्स जिओचा 543 रुपयांचा प्लॅन 56 दिवसांची वैधता देतो. हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला जवळपास 2 महिने रिचार्ज करण्याचा विचार करावा लागणार नाही. तुम्ही Jio अॅप किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन हा प्लॅन ॲक्टिव्हेट करू शकता. 543 रुपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये एकूण 112GB डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच तुमच्याकडे 112GB डेटा वापरण्यासाठी 56 दिवस आहेत. दैनंदिन मर्यादा संपल्यानंतर, तुमचा इंटरनेट स्पीड 64Kbps पर्यंत कमी केला जाईल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनेक फायदे मिळतात.

अन्य बेनिफिट्सही
रिलायन्स जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग मिळेल. जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसही मोफत मिळतात. प्लॅनमध्ये ग्राहकांना JioTV, JioCinema JioSecurity, JioCloud सारख्या ॲप्सचे सबस्क्रिप्शन देखील मिळते.

Web Title: Reliance Jio s Awesome Plan 112 GB Data Unlimited Calling See what s special jio tv jio apps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.