Join us  

Jio नं हळूच लाँच केला नवा प्लॅन! १३ OTT सह दररोज २ जीबी डेटा आणि मिळणार 'हे' फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 12:20 PM

Reliance Jio New Plan : रिलायन्स जिओनं नवा रिचार्ज प्लॅन आणला आहे. पाहा या प्लॅनसोबत कोणते मिळताहेत OTT Apps.

Reliance Jio New Plan : रिलायन्स जिओनं नवा रिचार्ज प्लॅन आणला आहे. हा रिचार्ज प्लान ४४८ रुपयांचा आहे. १३ हून अधिक लोकप्रिय ओटीटी अॅप्सचं सबस्क्रिप्शन यासह मिळतं. तसंच जिओ टीव्ही प्रीमियम बंडल प्लॅनसोबत येतं. जिओचा ४४८ रुपयांचा प्रीपेड प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो.

जिओच्या ४४८ रुपयांच्या प्लॅनचे फायदे?

या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. तसेच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. या प्लॅनमध्ये युजर्संना रोज १०० एसएमएस मिळतात. याशिवाय ओटीटी सब्सक्रिप्शन आणि जिओ टीव्हीचा आनंद घेता येणार आहे.

जिओच्या ४४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्संना सोनीलिव्ह, झी ५, जिओ सिनेमा, लायन्सगेट प्ले, डिस्कव्हरी+, सनएनएक्सटी, कांछा लांका, प्लॅनेट मराठी, होईचोई, चौपाल आणि फॅनकोड सारख्या ओटीटी अॅप्सचं सब्सक्रिप्शन मिळेल. तसंच युजर्सला जिओ क्लाउडच्या सुविधेचा आनंद घेता येणार आहे.

इंटरनेट डेटा ऑफर

या प्लॅनमध्ये युजर्संना दररोज २ जीबी डेटा दिला जाणार आहे. तसंच अनलिमिटेड ५जी इंटरनेट डेटा दिला जाणार आहे. मात्र, हा प्लॅन २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. अशावेळी वैधतेनुसार महागडा रिचार्ज प्लॅन आहे. पण जर तुम्ही वेगवेगळ्या ओटीटी अॅप्सचं सब्सक्रिप्शन घेत असाल तर अशा युजर्ससाठी हा एक चांगला प्लॅन ठरू शकतो. तसंच युजर्संना जिओ सिनेमा प्रीमियम मेंबरशिप मोफत मिळू शकते, जी वेगळी घेतल्यास २९ रुपये मोजावे लागतील. जिओच्या ४४८ रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ टीव्ही प्रीमियम सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. त्यामुळे जिओ युजर्सला भरपूर मनोरंजनाचा आनंद घेता येणार आहे.

टॅग्स :रिलायन्स जिओ