Join us

Jio ची खास ऑफर! केवळ ६९९ रुपयांमध्ये Netflix, Amazon Prime; १०० जीबी डेटा आणि बरंच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 10:25 AM

रिलायन्स जिओ सातत्यानं आपल्या ग्राहकांसाठी काही ना काही ऑफर्स आणत असते. कंपनीनं आता आणखी एक विशेष ऑफर दिली आहे.

रिलायन्स जिओ सातत्यानं आपल्या ग्राहकांसाठी काही ना काही ऑफर्स आणत असते. कंपनीनं आता आणखी एक विशेष ऑफर दिली आहे. यामध्ये ग्राहकांना डेटा, कॉलिंगसह नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम व्हिडीओचं फ्री सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. रिलायन्स जिओनं नुकताच जिओ फॅमिली प्लस प्लान लाँच केला आहे. यामध्ये ६९९ रुपयांचा प्लॅन ऑफर करण्यात येतो. या प्लानमध्ये नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राइम व्हिडिओचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. याशिवाय मोफत डेटा, कॉलिंग आणि मेसेजिंग सुविधा देण्यात आल्या आहेत. जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.

रिलायन्स जिओ ६९९ रुपये प्लॅनजिओचा ६९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. तसेच १००GB डेटा देण्यात येत आहे. याशिवाय दररोज १०० एसएमएस सुविधाही देण्यात येत आहे. याशिवाय अमर्यादित कॉलिंगचा लाभही देण्यात येतोय. यासोबतच नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राइम व्हिडीओचे सब्सक्रिप्शन एका महिन्यासाठी दिलं जात आहे. जिओचा ६९९ रुपयांचा प्लॅन एका महिन्याच्या फ्री ट्रायलसह येतो. याचा अर्थ तुमच्याकडून यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जर तुम्हाला सेवा आवडत नसेल तर तुम्ही ती बंद करू शकता. या प्लॅनमध्ये कुटुंबातील तीन सिम जोडले जाऊ शकतात. प्रत्येक सिम जोडण्यासाठी ९९ रुपये शुल्क द्यावं लागेल.

सिक्युरिटी डिपॉझिटजिओ फॅमिली प्लॅनसाठी तुम्हाला ८७५ रुपये शुल्क द्यावं लागेल. जिओ फायबर युझर्स, कॉर्पोरेट कर्मचारी, नॉन-जिओ पोस्टपेड युझर्स आणि चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना कोणतंही सिक्युरिटी डिपॉझिट भरावं लागणार नाही.

३९९ रुपयांचा प्लॅनजिओचा आणखी एक ३९९ रुपयांचा एक फॅमिली पोस्टपेड प्लॅन आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, मेसेजिंगची सुविधा देण्यात येतेय. यासोबतच ७५GB डेटा देण्यात येतो. एका महिन्यासाठी ट्रायल म्हणूनही तुम्ही हे पाहू शकता. तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून ५०० रुपये द्यावे लागतील.