Join us  

जिओचा ग्राहकांना दुसरा धक्का! आधी किंमती वाढवल्या, आता Jio'ने 'हे' OTT वाले प्लॅनही केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 4:52 PM

Reliance Jio Tariff Hike: जिओने काही दिवसापूर्वीच आपल्या प्लॅनच्या दरात वाढ केली आहे. आता पुन्हा एकदा ग्राहकांना धक्का दिला आहे.

Jio ने गेल्या काही दिवसापूर्वीच आपल्या ग्राहकांना धक्का दिला होता, आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा धक्का दिला आहे. रिलायन्स जिओचे नवीन दर ३ जुलैपासून लागू झाले आहेत. या अंतर्गत, कंपनीने प्रीपेड आणि पोस्टपेड योजनांच्या किमती मासिक, ३ महिन्यांच्या आणि वार्षिक योजनांसाठी १२% ते २७% पर्यंत वाढवल्या आहेत.

जिओने काही प्लॅनच्या किमती अपडेट केल्या आहेत. OTT सह येणारे काही प्लॅन बंद करण्यात आले आहेत. या यादीमध्ये Amazon Prime, SonyLIV आणि इतर OTT प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शनसह योजनांचा समावेश आहे. 

Reliance Jio Tariff Hike: जिओनं वाढवलं युझर्सचं टेन्शन! जुलैपासून २५ टक्के वाढणार मोबाईल रिचार्ज; चेक करा डिटेल्स

या प्लॅनमध्ये झाला बदल

Jio ने यापूर्वी आपल्या ग्राहकांसाठी OTT प्लॅटफॉर्मसह २१ प्लॅन दिले होते.

जिओने आपल्या प्लॅनच्या किंमती वाढवल्यानंतर, कंपनीने १४ प्लॅन काढले आणि फक्त ७ प्लॅन सुरू ठेवले आहेत.

हे मुख्य डेटा आणि कॉलिंग सेवांना प्राधान्य देण्यासाठी आहे.

लायन्स जिओनं आपल्या ग्राहकांना जोरदार धक्का दिला आहे. रिलायन्स जिओनं आपले सर्व प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन महाग केले आहेत. जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान १५५ रुपयांचा होता, तो वाढवून १८९ रुपये करण्यात आलाय. ओनं आपल्या सर्व मासिक, तीन महिन्यांच्या आणि वार्षिक प्लॅनच्या दरात वाढ केली आहे. याशिवाय पोस्टपेड प्लॅनच्या दरातही वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

रिलायन्स जिओने नुकतीच दरवाढ जाहीर केली आहे. सध्या अस्तित्वात असलेले सर्व डेटा प्लॅन महाग करण्यात आले आहेत. हे नवे दर ३ जुलै २०२४ पासून महाग होणार आहेत. जिओचा सर्वात स्वस्त प्लान १५५ रुपयांऐवजी १८९ रुपयांना मिळणार आहे.

जिओने या प्लानमध्ये २२ टक्के वाढ केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भारती एअरटेलच्या आधी जिओने या वाढीची घोषणा केली आहे. जिओनं आपल्या १९ प्लान्सचे टॅरिफ वाढवले आहेत. यामध्ये १७ प्रीपेड प्लॅन आणि २ पोस्टपेड प्लान्सचा समावेश आहे.

टॅग्स :जिओमोबाइल