Join us

मुकेश अंबानींच्या Reliance Jio ची प्रतिस्पर्धी Airtel सोबत हातमिळवणी; केला १५०० कोटींचा करार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 10:45 AM

Airtel Spectrum Trading Agreement with Jio: दूरसंचार विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करार केल्याची जिओची माहिती, ग्राहकांना होणार मोठा फायदा

ठळक मुद्देदूरसंचार विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार करार केल्याची जिओची माहितीग्राहकांना होणार मोठा फायदा

देशातील दूरसंचार क्षेत्रातील दोन मोठ्या प्रतिस्पर्धी कंपन्या Reliance Jio आणि Airtel नं एक मोठा करार केला आहे. जवळपास १५०० कोटी रूपयांचा दोन्ही कंपन्यांमध्ये करार करण्यात आला आहे. रिलायन्स जिओनं या कराराबाबत माहिती दिली. याचा फायदा मुंबई, आंध्र प्रदेश, दिल्ली या सर्कल्समधील ग्राहकांना होणार आहे. मुंबई, आंध्र प्रदेश आणि दिल्ली सर्कलमधील ८०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी हा करार करण्यात आला आहे. या कराराचं एकूण मूल्य गे १४९७ कोटी रूपये इतकं आहे. या करारानंतर या तिन्ही सर्कलमधील ग्राहकांना उत्तम नेटवर्क अनुभवता येणार आहे. या कराराद्वारे एअरटेललारिलायन्स जिओ १०३७.६ कोटी रूपये देईल. तसंच जिओ स्पेक्ट्रमशी निगडीत ४५९ कोटी रूपयांची फ्युचर लायबिलिटीजही फेडणार आहे. भारती एअरटेलनं याबाबत माहिती दिली. एअरटेलनंदेखील या कराराबाबत अधिक माहिती दिली. या कराराअंतर्गत एअरटेल आंध्र प्रदेश, दिल्ली आणि मुंबईतील आपले ८०० मेगाहर्ट्झच्या स्पेक्ट्रमचे अधिकार रिलायन्स जिओला देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या अंतर्गत रिलायन्स जिओला मुंबईत २.५० मेगाहर्ट्झ, आंध्र प्रदेशात ३.७५ मेगाहर्ट्झ आणि दिल्ली १.२५ मेगाहर्ट्झ अतिरिक्त स्पेक्ट्रमचा वापर करण्यास मिळणार आहे. सध्या या कराराला नियामक मंडळाची मंजुरी मिळणं शिल्लक आहे. 

ग्राहकांना मिळणार उत्तम सेवातिन्ही सर्कल्समध्ये ८०० मेगाहर्ट्झच्या ब्लॉक्सच्या विक्रीतून कंपनीनं ती व्हॅल्यू युटिलाईझ केली ज्याचा वापर होत नव्हता. हा करार कंपनीची ओव्हरऑल स्ट्रॅटेजी आहे, अशी माहिती भारती एअरटेलचे एमडी आणि सीईओ (भारत आणि दक्षिण आशिया) गोपाल विट्टल यांनी दिली. तर दुसरीकडे रिलायन्स जिओनं म्हटल्याप्रमाणे स्पेक्ट्रममध्ये वाढ झाल्यानं त्यांची नेटवर्क कॅपिसिटी वाढणार आहे. तसंच या करारानंतर रिलायन्स जिओकडे मुंबई सर्कलमध्ये २X*१५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम, आंध्र प्रदेशात ८०० मेगाहर्ट्झ बँडमध्ये 2X*१० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम उलब्ध होईल. यामुळे रिलायन्स जिओला उत्तम सेवा देण्यास मदत मिळणार आहे आणि नेटवर्क क्षमताही वाढणार आहे. 

टॅग्स :रिलायन्स जिओएअरटेलमुकेश अंबानीसुनिल मित्तलमुंबईदिल्लीआंध्र प्रदेश