अनेकदा बरेच लोक आपला नंबर सुरू ठेवण्यासाठी रिचार्ज करत असतात. सध्या WiFi च्या युगामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत. आजकाल घरात वायफाय कनेक्शन असणं सामान्य जालं आहे. घरी जरी नसलं तरी ऑफिसमध्ये मात्र वायफाय कनेक्शन मिळतं. याचाच फायदा टेलिकॉम कंपन्या घेत आहेत. कंपन्या पूर्वीपेक्षा जास्त किमतीत 28 दिवस किंवा 30 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन देत आहेत. स्वस्त प्लॅन्सबद्दल सांगायचं झाल्यास Jio 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे तीन प्लॅन ऑफर करत आहे. यामध्ये 10, 20 आणि 50 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे. तुम्ही तुमचा जिओ नंबर फक्त सुरू ठेवण्यासाठी रिचार्ज करत असाल तर हे तीन प्लॅन्स तुमच्यासाठी सर्वोत्तम आहेत.
10 रूपयांचा प्लॅन हा एक टॉप अप प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 7.47 रूपयांचा टॉक टाईम देण्यात येतो. तसंच याची वैधता अनलिमिटेड आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना या टॉकटाईमशिवाय काहीही मिळत नाही. याचा वापर तुम्ही आंतरराष्ट्रीय कॉलसाठीही करू शकता.
20 रूपयांचा प्लॅनही एक टॉप अप प्लॅन आहे. यामध्ये ग्राहकांना 14.95 रूपयाचा टॉक टाईम मिळतो. तसंच या प्लॅनमध्ये युझर्सना अनलिमिटेड वैधता मिळते. याशिवाय ग्राहकांना कोणतेही बेनिफिट्स दिले जात नाहीत. ५० रूपयांचा प्लॅनही टॉप अप प्लॅनच आहे. यामध्ये ग्राहकांना 39.37 रूपयांचा टॉक टाईम देण्यात येतो. तसंच अनलिमिटेड वैधताही मिळते. यामध्ये आणखी कोणतंही बेनिफिट देण्यात येत नाही. याशिवाय याचा वापर आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठीही केला जाऊ शकतो.