Reliance Jio True 5G : रिलायन्स जिओची ट्रू 5जी सेवा आता पुण्यातील लोकांनाही उपलब्ध होणार आहे. जिओने बुधवारी पुण्यात 1Gbps स्पीडसह अमर्यादित 5G डेटाची सुरूवात केली. जिओने शहरात Jio True 5G ची बीटा सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत शहरातील बहुतांश भागात स्टँडअलोन ट्रू 5जी नेटवर्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासह, जिओच्या ग्राहकांना चांगले कव्हरेज आणि अत्याधुनिक Jio 5G नेटवर्कचा आनंद घेता येणार आहे.
“12 शहरांमध्ये Jio True 5G सेवा सुरू केल्यानंतर, मोठ्या संख्येने ग्राहकांनी Jio वेलकम ऑफरसाठी नोंदणी केली आहे. ग्राहकांचा अनुभव आणि फीडबॅक 5G नेटवर्क तयार करण्यात मदत करत आहे,” अशी प्रतिक्रिया जिओच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली. यापूर्वी रिलायन्स जिओने बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये जिओ ट्रू 5जी सेवा लाँच केली होती. Jio True 5G सेवा मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, वाराणसी आणि नाथद्वारा येथेही पुरवल्या जात आहेत.
1Gbps पर्यंत स्पीडप्रवक्त्यांनी सांगितलं की अपेक्षेप्रमाणे, Jio True 5G नेटवर्क वर Jio च्या 4G नेटवर्कपेक्षा कितीतरी पट अधिक डेटा वापरत आहे. डेटा एक्सपिरिअन्सचा स्पीज आणि लेटेंन्सीची आकडेवारी हे दाखवते की लोकांना जवळपास 500 एमबीपीएस ते 1Gbps डेटा स्पीड मिळत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आहेत पुणे देशाचे आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. ऑटोमोबाइल आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्येही पुण्याचे मोठे स्थान आहे. बुधवारपासून सुरू झालेली जिओ वेलकम ऑफर, पुण्यातील सर्व जिओ ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अमर्यादित डेटासह 1Gbps पर्यंतच्या गतीचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करत आहे.