Join us

गोड बातमी... ५ रुपयांच्या चॉकलेटवर १ जीबी डेटा फ्री फ्री फ्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 13:27 IST

रिलायन्स जिओने टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. जिओच्या एंट्रीनंतर इंटरनेट आणि कॉलिंग पॅकेजसाठी सर्वच कंपन्यांमध्ये तुफान स्पर्धा सुरु झाल्याचे आपण पाहात आहोत. मात्र, रिलायन्स जिओने

मुंबई - आपल्या लक्षवेधी योजना आणि ऑफरमुळे रिलायन्स जिओने ग्राहकांशी एक जवळचे नाते जोडले आहे. आता, आणखी एका ऑफरमुळे जिओकडून ग्राहकांना गोड गिफ्ट मिळणार आहे. कुछ मिठा हो जाए, म्हणत ग्राहकांशी गोड नाते जपण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कंपनीकडून आपल्या द्वितीय वर्षपूर्तीनिमित्त डेअरी मिल्क चॉकटेलसोबत 1 जीबी डेटा मोफत देण्यात येणार आहे. 

रिलायन्स जिओने टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. जिओच्या एंट्रीनंतर इंटरनेट आणि कॉलिंग पॅकेजसाठी सर्वच कंपन्यांमध्ये तुफान स्पर्धा सुरु झाल्याचे आपण पाहात आहोत. मात्र, रिलायन्स जिओने सर्वांपुढे आघाडी घेत आपले स्थान अबाधित आणि कायम ठेवले आहे. रिलायन्स जिओच्या एंट्रीला आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कंपनीने ग्राहकांचे तोंड गोड करण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच, डेअरी मिल्क कॅडबरीच्या खरेदीवर चक्क 1 जीबी डेटा मोफत देऊन ग्राहकांशी गोडवा जपण्याचं काम जिओने केलं आहे. 

असा मिळेल लाभ* MyJio अॅप वर देण्यात आलेल्या नवीन ऑफरनुसार जिओ युजर्संना 1 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. * त्यासाठी ग्राहकांना सर्वप्रथम Dairy Milk चॉकलेट खरेदी करावे लागेल. या चॉकलेटच्या रॅपरमध्ये एक बार कोड देण्यात आला आहे. * आता अॅपमध्ये दिल्या गेलेल्या Dairy Milk Wrapper च्या फोटोवर क्लीक करावे लागणार आहे. त्यामुळे फोनचा कॅमेरा खुला होईल. * त्यानंतर, रॅपरमध्ये दिलेल्या बारकोडला कॅमेऱ्याने स्कॅन करावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये हा 1 जीबी मोफत डेटा जमा होणार आहे. * डेअरी मिल्कच्या 5 रुपयांपासून सुरू होणाऱ्या सर्वच चॉकलेटवर ही ऑफर मिळणार आहे. मात्र, तुम्ही हा डेटा प्रथम फाऊंडेशनला डोनेट करु शकता, ज्यामुळे गरीब मुलांना चांगली शिक्षा देण्यात येते. कंपनीकडून ग्राहकांना तसा पर्याय देण्यात आला आहे. 

टॅग्स :रिलायन्स जिओजिओइंटरनेट