Join us

२०० रूपयांपेक्षा स्वस्त प्रीपेड प्लॅन्स; पाहा Jio आणि Airtel मधील कोणते आहेत बेस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 7:33 PM

सध्या कंपन्यांकडून कमी किंमतीत अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत.

ठळक मुद्देसध्या कंपन्यांकडून कमी किंमतीत अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत.सध्या आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांमध्ये सुरू आहेत स्पर्धा

Reliance Jio आणि Bharti Airtel हे देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत. दोन्ही कंपन्या अधिकाधिक ग्राहकांना जोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. हे करण्यासाठी, जिओ आणि एअरटेल दोन्ही आपल्या युझर्सना कमी किंमतीच्या प्रीपेड योजना ऑफर करत आहेत. जर आपण प्रीपेड युझर असाल आणि आपल्याला कमी किंमतीत एखादा चांगला प्लॅन हवा असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला जिओ आणि एअरटेलच्या एंट्री-लेव्हल प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत जे २०० रुपयांपेक्षा कमी आहेत.जिओ आणि एअरटेलकडे २०० रुपयांच्या कमी अनेक प्रीपेड प्लॅन्स आहेत. जिओ आपल्या ग्राहकांना २०० रुपयांपेक्षा कमी दोन प्लॅन्स ऑफर करत आहे. त्याची किंमत १४९ आणि १९९ रुपये आहे. तर त्याच वेळी, एअरटेलकडे त्यांच्या ग्राहकांसाठी २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे अनेक प्लॅन्स आहेत. ज्याची किंमत १९ ते १९९ रुपयांपर्यंत आहे.Relianc Jio चे प्लॅन्सरिलायन्स जिओचा सर्वात कमी किमतीचा प्रीपेड प्लॅन म्हणजे १४९ रुपये इतका आहे. या प्लॅनमध्ये  अमर्यादित व्हॉईस कॉलिंग, दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस दिले जातात. या योजनेची वैधता २४ दिवस आहे. म्हणजेच या प्लॅनसह ग्राहकांना एकूण २४जीबी डेटा मिळेल. त्याचबरोबर १९९ रुपयांच्या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये दररोज १.५ जीबी डेटा देण्यात येतो. या योजनेत वापरकर्त्यांना दररोज अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. या व्यतिरिक्त या दोन्ही प्लॅन्ससह कंपनी आपल्या ग्राहकांना Jio अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन देते. यात JioTV, JioSecurity, JioCinema, JioNews, JioSaavn आणि JioCloud चं सबस्क्रिप्शन मिळतं.Bharati Airtel चे प्लॅनभारती एअरटेलकडे २०० रूपयांपेक्षा कमी किंमतीचे अनेक प्लॅन्स आहेत. यामध्ये १९ रूपये, १२९ रुपये, १४९ रूपये, १७९ रुपये आणि १९९ रूपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. १९ रूपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना २०० एमबी डेटा आणि अमर्याद कॉलिंगची सुविधा मिळते. हा प्लॅन दोन दिवसांसाठी वैध असतो. १२९ रूपयांच्या प्लॅमध्ये ग्राहकांना २४ दिवसांची वेधता, दररोज १ जीबी डेटा, अमर्याद कॉलिंग आणि ३०० एसएमएस दिले जातात. एअरटेलच्या १४९ रूपयांच्या प्लॅनमध्ये २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा, अमर्याद कॉलिंग, ३०० एसएमएस मिळतात. १४९ आणि १७९ रूपयांच्या प्लॅनमध्ये एकच फरक आहे. त्यात भारती अॅक्सा लाईफ इन्शॉरन्सचं २ लाखांचं कव्हर मिळतं. १९९ रूपयांच्या प्लॅमध्ये ग्राहकांना २४ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा, अमर्याद कॉलिंग, दररोज १०० एसएमएस मिळतात. १९ रूपयांचा प्लॅन सोडला तर सर्व प्लॅनसह ग्राहकांना एअरटेल एक्सट्रिम आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचं १ महिन्याचं स्मार्टफोनसाठीचं सबस्क्रिप्शन मिळतं.

टॅग्स :स्मार्टफोनएअरटेलरिलायन्स जिओइंटरनेट