Join us  

Reliance Jio : २० रूपये अधिक देऊन मिळतोय २२ जीबी अतिरिक्त डेटा, पाहा कोणता आहे प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 5:13 PM

सध्या Reliance Jio, Airtel, Vodafone-Idea या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवे प्लॅन्स आणत आहेत.

ठळक मुद्देसध्या Reliance Jio, Airtel, Vodafone-Idea या कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवे प्लॅन्स आणत आहेत.

रिलायन्स जिओच्या 2 स्वस्त रिचार्ज प्लॅन्सची तुलना करून, आम्ही सांगत आहोत की 20 रुपये अधिक खर्च करून तुम्ही 22GB अधिक डेटा कसा मिळवू शकता. रिलायन्स जिओचे 129 आणि 149 रुपयांचे हे प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत. जिओचे हे दोन्ही प्लान 150 रुपयांपेक्षा कमी श्रेणीत आहेत. तर रिलायन्स जिओच्या या दोन्ही प्लॅनमध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळतात आणि कोणत्या प्लॅनमध्ये तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो ते आपण पाहू.

129 रुपयांचा रिचार्ज प्लॅन रिलायन्स जिओच्या व्हॅल्यू प्लॅनचा भाग आहे. जिओच्या या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये युझर्सना एकूण 2GB डेटा दिला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा कमी आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. तसंच या प्लॅनमध्ये ग्राहकांना 300 SMS पाठवण्याची सुविधा मिळते. तसेच, जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही देण्यात येतं. 

जर तुम्ही 129 आणि 149 रुपयांच्या प्लॅनची ​​तुलना केली तर 20 रुपये अधिक देऊन, युझर्सना 149 रुपयांचा रिचार्ज प्लान घेतल्यास एकूण 24GB डेटा मिळतो. त्याचबरोबर 129 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 2GB डेटा उपलब्ध आहे. म्हणजेच 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 22GB अधिक डेटा उपलब्ध आहे. याशिवाय 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2400 एसएमएस उपलब्ध आहेत, तर 129 रूपयांच्या  प्लॅनमध्ये 300 एसएमएस उपलब्ध आहेत. दरम्यान, 129 रुपयांच्या प्लॅनच्या तुलनेत 149 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता कमी आहे. 129 रुपयांच्या प्लानमध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. त्याचबरोबर 149 रुपयांच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. 

 

टॅग्स :रिलायन्स जिओव्होडाफोनआयडियाएअरटेलइंटरनेट