Join us

धूम धूम! जगभरात Reliance Jio ची बूम; 40 कोटी ग्राहकांसोबत बनली नंबर 1

By हेमंत बावकर | Published: October 31, 2020 5:12 PM

Reliance Jio: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ आणि रिटेल व्य़वसायात कंपनीने गेल्या ६ महिन्यांत मोठ्या वाढीसह रिलायन्स ग्रुपमध्ये अनेक रणनीतिक आणि आर्थिक गुंतवणूकदारांचे स्वागत केले आहे. 

कमी काळात भारताची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनलेल्या रिलायन्स जिओने (Reliance Jio ) जगभरातील दिग्गज कंपन्यांना मागे टाकले आहे. रिलायन्स जिओचा सबस्क्रायबर बेस हा तब्बल 40 कोटींवर गेला आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीतील कामगिरीची माहिती देताना ही आकडेवारी जाहीर केली आहे. महत्वाचे म्हणजे जिओने नुकतीच व्होडाफोन आणि आयडियाला टक्कर देण्यासाठी पोस्टपेड प्लॅन लाँच केले होते. एका देशात 40 कोटींपेक्षा जास्त ग्राहक बनविणारी जिओ जगातील पहिली कंपनी बनली आहे. 

रिलायन्स जिओनुसार कंपनीचा युजरबेस हा 40.56 कोटी झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीने 13.96 टक्के वाढ नोंदविली आहे. 2019 मध्ये याच तिमाहीत कंपनीचे 35.59 ग्राहक होते. सप्टेंबरच्या तिमाहीत नवीन 73 लाख ग्राहक मिळाले आहेत. तर जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने 99 लाख ग्राहक जोडले होते. 

करोडोंची गुंतवणूक आली तरीही Reliance चा नफा घटला; जिओचा ट्रिपल धमाका

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ आणि रिटेल व्य़वसायात कंपनीने गेल्या ६ महिन्यांत मोठ्या वाढीसह रिलायन्स ग्रुपमध्ये अनेक रणनीतिक आणि आर्थिक गुंतवणूकदारांचे स्वागत केले आहे. 

रिलायन्स जिओचा शुद्ध नफा 2844 कोटींवरगेल्या चार वर्षांत देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी बनलेल्या रिलायन्स जिओचा शुद्ध नफा या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत तिपटीने वाढला आहे. जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीला लाभ 2844 कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत कंपनीला 990 कोटी रुपयांचा लाभ झाला होता. तिमाहीच्या आधारे ही वाढ 12.85 टक्के एवढी आहे. जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीला 2520 कोटींचा निव्वळ नफा झाला होता. 

शेअर बाजारामध्ये दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे उत्पन्न 33 टक्क्यांनी वाढून 17,481 कोटी रुपये झाले आहे. 2019-20 च्या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 13130 कोटी रुपये झाले होते. सप्टेंबर तिमाहीत सरासरी महसूल प्रति यूजर म्हणजेच ARPU हा वाढून 145 रुपये झाला होता. जूनच्या तिमाहीत हा महसूल 140.30 रुपये होता. 

टॅग्स :रिलायन्स जिओरिलायन्स