Join us  

जवळपास ३ महिने चालणार Reliance Jioचा हा प्लॅन; दिवसाचा खर्च ५ रूपयांपेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 10:49 PM

Reliance Jio Prepaid Recharge Plans : सध्या अनेक कंपन्यांनी आपले रिचार्ज पॅक्स महाग केले आहेत. परंतु अद्यापही काही स्वस्त रिचार्ज प्लॅन्स आहेत.

Reliance Jio ने आपले सर्वच रिचार्ज प्लॅन महाग केले असतील, परंतु तरीही अनेक प्रीपेड प्लॅन्स तुम्हाला खूप कमी किमतीत उत्तम फायदे देऊ शकतात. जर तुमचा डेटाचा वापर कमी असेल आणि तुम्हाला अधिक वैधतेसह अनलमिटेड कॉलिंगचा (Unlimited Calling) लाभ घेऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला आम्ही 400 रुपयांपेक्षा कमी 84 दिवसांची वैधता असलेल्या प्‍लॅनची ​​माहिती देणार आहोत. 

आम्ही Reliance Jio च्या 395 रुपयांच्या प्लॅनबद्दल तुम्हाला सांगत आहोत. या प्लॅनसह कंपनी वापरकर्त्यांना 84 दिवसांची वैधता देते. Jio प्रीपेड प्लॅन्सच्या पोर्टफोलिओमध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या प्लॅनचा एका दिवसाचा खर्च फक्त 4.7 रुपये आहे.

प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 6 GB डेटा दिला जातो. तुम्ही हा डेटा 84 दिवसांमध्ये कधीही वापरू शकता. याशिवाय, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण 1000 एसएमएस देखील 84 दिवसांसाठी दिले जातात. या प्लॅनमध्ये केवळ डेटाशिवाय, मोफत कॉलिंग आणि एसएमएस, चित्रपट पाहण्यासाठी Jio Cinema, लाइव्ह टीव्ही पाहण्यासाठी Jio TV, जिओ सिक्युरिटी आणि जिओ क्लाउडचंही मोफत सबस्क्रीप्शन मिळतं.

Airtel आणि Vi चा प्लॅनव्होडाफोनचा सर्वात स्वस्त 84 दिवसांचा प्लॅन 459 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये 6GB डेटा लाभ, 1000 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंग उपलब्ध आहेत. या प्लॅन अंतर्गत Vi ​​Movies आणि TV चं अॅक्सेस देण्यात येतं. त्याच वेळी, एअरटेलचा 84 दिवसांचा वैधता असलेला प्लॅन 455 रुपयांचा आहे. यामध्ये 6GB डेटा बेनिफिट, 900 SMS आणि अनलिमिटेड कॉल्सही उपलब्ध आहेत. याशिवाय प्राइम व्हिडिओ मोबाईलचं मोफत ट्रायल, फ्री हॅलोट्यून्स, विंक म्युझिक फ्री सबस्क्रिप्शन यासारख्या गोष्टीही उपलब्ध आहेत.

टॅग्स :रिलायन्स जिओएअरटेलव्होडाफोनआयडिया