Join us

रिलायन्सची SBI कार्ड्ससोबत हातमिळवणी, ग्राहकांसाठी लाँच झालं स्पेशल कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 2:17 PM

मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल आणि एसबीआय कार्ड यांच्यात यासाठी करार झालाय.

Reliance SBI Card: आता तुम्हाला बाजारात रिलायन्सचं क्रेडिट कार्ड पाहायला मिळणार आहे. यासाठी मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल आणि एसबीआय कार्ड यांच्यात करार झालाय. या कार्डच्या माध्यमातून युझर्सना खरेदीवर मोठा फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलंय. हे कार्ड Reliance SBI Card, Reliance SBI Card PRIME या २ व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आलंय. प्राईम कार्डाची अॅन्युअल फी २९९९ रुपये आणि टॅक्स अशी आहे. तर रिलायन्स एसबीआय कार्डासाठी ग्राहकांना ४९९ रुपये आणि टॅक्स असं शुल्क मोजावं लागेल.कार्डधारकांना रिलायन्स एसबीआय प्राईम कार्डावर ३ लाख रुपये वार्षिक आणि रिलायन्स एसबीआय कार्डावर १ लाख रुपये वार्षिक खर्च करता येतील. हे कार्ड रिसायकल्ड प्लास्टिकच्या माध्यमातून तयार करण्यात आलंय. तसंच हे कार्ड RuPay प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आलंय.कंपनीला रिलायन्स रिटेलसोबत हातमिळवणी करुन आनंद झाला आहे. ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल अशा प्रोडक्टच्या रुपात रिलायन्स एसबीआय कार्ड तयार करण्यात आल्याची प्रतिक्रिया एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ अभिजित चक्रवर्ती यांनी दिली.रिलायन्स रिटेल बाबतरिलायन्स रिटेल लिमिटेड, रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे. आरव्हीएलनं ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात २६०,३६४ कोटींची उलाढाल आणि ९१८१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडियामुकेश अंबानीरिलायन्स