Join us  

मुकेश अंबानी यांच्या Reliance ची ऐतिहासिक कामगिरी; 'हा' रेकॉर्ड करणारी पहिली कंपनी...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 2:58 PM

Reliance MCap @20 Lakh Crore : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Reliance MCap @20 Lakh Crore : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) इतिहास रचला आहे. याचे कारण म्हणजे, रिलायन्सचे बाजार भांडवल (Reliance MCap) 20 लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, हा आकडा गाठणारी ती पहिली भारतीय कंपनी ठरली आहे.

RIL शेअरच्या वाढीचा परिणामआठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात व्यवहार सुरू होताच रिलायन्सच्या (Reliance Stock) शेअर्समध्ये वाढ सुरू झाली आणि काही वेळातच 2 टक्क्यांची झेप घेऊन 2958 रुपयांची पातळी गाठली. ही या शेअरची सर्वोच्च पातळी आहे. शेअरच्या किमतीत झालेल्या या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप 20 लाख कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले.

1 लाख कोटींनी वाढली कंपनीची व्हॅल्यूशेअर बाजार उघडताच रिलायन्सचा शेअर 2911 रुपयांच्या पातळीवर उघडला आणि 2958 रुपयांच्या उच्च पातळीवर पोहोचला. मात्र, यानंतर यात थोडी घसरण झाली आणि दुपारपर्यंत हा 2930 रुपयांवर आला. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून रिलायन्सच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत असल्याने कंपनीचे बाजारमूल्यही वाढत आहे. गेल्या दोन आठवड्यांत कंपनीच्या व्हॅल्यूएशनमध्ये सुमारे एक लाख कोटींची वाढ झाली आहे.

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढरिलायन्स समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या बाजारमूल्यात झालेल्या वाढीचा परिणाम मुकेश अंबानी यांच्या निव्वळ संपत्तीवरही दिसून येतोय. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, रिलायन्सच्या अध्यक्षांची संपत्ती 109 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली असून, या संपत्तीसह ते जगातील सर्वोच्च अब्जाधीशांच्या यादीत 11 व्या स्थानावर पोहोचले आहेत. तसेच, ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. विशेष म्हणजे, 2024 मध्ये आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत $12.9 बिलियनची वाढ झाली आहे.

(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक