Lokmat Money > बिझनेस न्यूज > Reliance ची दमदार कमागिरी; अवघ्या 5 दिवसात गुंतवणुकदारांची 50,000 कोटींची कमाई

Reliance ची दमदार कमागिरी; अवघ्या 5 दिवसात गुंतवणुकदारांची 50,000 कोटींची कमाई

Reliance Market Value Rise : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. यादरम्यान, मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्सने दमदार कामगिरी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 03:01 PM2023-12-24T15:01:22+5:302023-12-24T15:02:02+5:30

Reliance Market Value Rise : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. यादरम्यान, मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्सने दमदार कामगिरी केली.

Reliance Market Value Rise: Strong Performance of Mukesh Ambani's Reliance; 50,000 crores earned by investors in 5 days | Reliance ची दमदार कमागिरी; अवघ्या 5 दिवसात गुंतवणुकदारांची 50,000 कोटींची कमाई

Reliance ची दमदार कमागिरी; अवघ्या 5 दिवसात गुंतवणुकदारांची 50,000 कोटींची कमाई

Reliance Market Value Rise : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. पाच दिवसात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड टॉप-10 कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये घसरण झाली, तर तीन कंपन्यांनी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. यामध्ये मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीज टॉपवर राहिली.

रिलायन्सची जबरदस्त कमाई
पीटीआयच्या मते, देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यातील सुमारे 50,000 कोटी रुपयांची कमाई केली. या कालावधीत रिलायन्सचे बाजार भांडवल (रिलायन्स एमकॅप) 47,021.59 कोटी रुपयांनी वाढले आणि कंपनीचे मूल्य 17,35,194.85 कोटी रुपयांवर गेले. 

या कंपन्यांचीही कमाई
रिलायन्स इंडस्ट्रीज व्यतिरिक्त ज्या दोन कंपन्यांचे बाजार मूल्य वाढले, त्यात हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) आणि खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या HDFC बँकेचा समावेश आहे. या कालावधीत, HUL चे MCap रु. 12,241.37 कोटींनी वाढून रु. 6,05,043.25 कोटींवर पोहोचले, तर HDFC बँकेचे मार्केट कॅप रु. 11,049.74 कोटींनी वाढून रु. 12,68,143.20 कोटींवर पोहोचले.

TCS सह या कंपन्यांचे पैसे बुडाले
ICICI बँकेच्या मार्केट कॅपमध्ये (ICICI Bank MCap) गेल्या आठवड्यात 30,235.29 कोटी रुपयांची घसरण नोंदवली गेली. सध्या कंपनीचे Mcap 6,97,095.53 पर्यंत खाली आले आहे. यानंतर टाटा समूहाची आयटी कंपनी TCS चे मार्केट कॅप 12,715.21 कोटी रुपयांनी कमी होऊन 13,99,696.92 कोटी रुपयांवर आले. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचे मूल्यही 5,68,185.42 कोटी रुपयांवर घसरले आणि गुंतवणूकदारांना 10,486.42 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

(नोट- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Read in English

Web Title: Reliance Market Value Rise: Strong Performance of Mukesh Ambani's Reliance; 50,000 crores earned by investors in 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.