Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानींची २४ तासात १९,००० कोटींची कमाई केली! अब्जाधीशांच्या यादीत समावेश

मुकेश अंबानींची २४ तासात १९,००० कोटींची कमाई केली! अब्जाधीशांच्या यादीत समावेश

मुकेश अंबानींनी अवघ्या एका दिवसात १९,००० कोटींची कमाई केली असून त्यानंतर ते ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये १३ व्या स्थानावर आले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 07:23 PM2023-07-05T19:23:23+5:302023-07-05T19:23:50+5:30

मुकेश अंबानींनी अवघ्या एका दिवसात १९,००० कोटींची कमाई केली असून त्यानंतर ते ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये १३ व्या स्थानावर आले आहेत.

reliance mukesh ambani net worth rise 90 billion dollar top 10 billionaires list | मुकेश अंबानींची २४ तासात १९,००० कोटींची कमाई केली! अब्जाधीशांच्या यादीत समावेश

मुकेश अंबानींची २४ तासात १९,००० कोटींची कमाई केली! अब्जाधीशांच्या यादीत समावेश

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा पुन्हा एकदा जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे. अंबानींनी अवघ्या एका दिवसात १९,००० कोटींची कमाई केली असून त्यानंतर ते ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्समध्ये १३ व्या स्थानावर आले आहेत. सध्या टॉप-10 मध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना फक्त ३ उद्योगपतींना मागे सोडावे लागणार आहे. हे काम करायला जास्त वेळ लागणार नाही कारण त्यांच्या आणि इतर लोकांच्या संपत्तीत फारसे अंतर नाही.

पॅन निष्क्रिय झाले असेल तर १३ प्रकारचे आर्थिक व्यवहार करू शकणार नाही, वापरावर १० हजारांचा दंड

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या २४ तासांत २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. या वाढीनंतर अंबानींची एकूण संपत्ती ९० अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत मुकेश अंबानींना ३.४६ बिलियन डॉलरच्या नेट वर्थचा नफा झाला आहे.

या यादीत १२व्या स्थानावर फ्रान्सचे फ्रँकोइस बेटान्कोर्ट मीर्स आहेत, ज्यांची एकूण संपत्ती ९२.६ डॉलर अब्ज आहे. याशिवाय मेक्सिकोचे कार्लोस स्लिम ११व्या स्थानावर आहेत, ज्यांची संपत्ती सुमारे ९७.२ अब्ज डॉलर आहे. १० व्या स्थानावर अमेरिकेचे सेर्गे ब्रिन आहेत, यांची मालमत्ता १०४ अब्ज डॉलरच्या जवळपास आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सच्या यादीत अंबानींचे स्थान १३ वे आहे आणि असे मानले जात आहे. लवकरच टॉप-10 मध्ये प्रवेश करू शकतात. गौतम अदानी या यादीत २१ व्या स्थानावर आहेत. श्रीमंतांच्या यादीतही तो टॉप-20 मधून बाहेर पडले आहेत.

Web Title: reliance mukesh ambani net worth rise 90 billion dollar top 10 billionaires list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.