Lokmat Money > बिझनेस न्यूज > ₹१५००० कोटींसाठी अंबानींचा 'लोकल'वर फोकस, आखतायत तगडा प्लॅन

₹१५००० कोटींसाठी अंबानींचा 'लोकल'वर फोकस, आखतायत तगडा प्लॅन

वाचा काय आहे अंबानींचा प्लॅन.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 03:36 PM2023-11-02T15:36:43+5:302023-11-02T15:38:09+5:30

वाचा काय आहे अंबानींचा प्लॅन.

reliance mukesh Ambani s focus on local bond sell rs 15000 crore a strong planning expansion of business | ₹१५००० कोटींसाठी अंबानींचा 'लोकल'वर फोकस, आखतायत तगडा प्लॅन

₹१५००० कोटींसाठी अंबानींचा 'लोकल'वर फोकस, आखतायत तगडा प्लॅन

मुकेश अंबानींच्यारिलायन्स इंडस्ट्रीजची लोकल करन्सी बॉन्डच्या माध्यमातून 15,000 कोटी रुपये (1.8 अब्ज डॉलर्स) उभारण्याची योजना आहे. ही योजना यशस्वी झाल्यास, रिलायन्ससाठी चलनातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी बाँड विक्री असेल. 2020 नंतर कंपनी आपले पहिले देशांतर्गत बाँड जारी करून पैसे उभारणार आहे.

लोकल करन्सी बॉन्ड म्हणजे काय?
याला देशांतर्गत करन्सी बॉन्ड असंही म्हणतात. हे लोन सिक्युरिटीज आहेत जे जारी केले जातात आणि विशिष्ट देशाच्या स्थानिक चलनात जारी केले जातात. हे बॉन्ड सहसा सरकार, कॉर्पोरेशन किंवा देशातील इतर संस्थांद्वारे जारी केले जातात. त्याच वेळी, बॉन्डचे मुद्दल आणि व्याज स्थानिक चलनात दिलं जातं. 

हे विदेशी करन्सी बॉन्डपेक्षा वेगळे आहेत. विदेशी बॉन्ड्स हे परकीय चलनात डिनोमिनेटेड असतात आणि त्या विदेशी चलनात मुद्दल किंवा व्याज दिले जातं. स्थानिक चलन रोख्यांमधील गुंतवणूकदारांना जारीकर्त्याच्या क्रेडिट जोखमीचा तसेच देशांतर्गत व्याजदरांमधील बदलांशी संबंधित व्याजदर जोखमीचा सामना करावा लागतो.

विस्ताराचा प्रयत्न
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज विस्ताराच्या मार्गावर आहे. यात, तेल आणि नैसर्गिक वायू व्यवसायाव्यतिरिक्त, कंपनी रिटेल, दूरसंचार, ऊर्जा आणि वित्त क्षेत्रात आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. अशा परिस्थितीत रिलायन्स इंडस्ट्रीजला पैसा उभा करणं आवश्यक झालं आहे. या अंतर्गत, रिलायन्स रिटेल आपला हिस्सा विकून कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि केकेआर अँड कंपनी सारख्या धोरणात्मक गुंतवणूकदारांना व्यवसायात आणत आहे.

Web Title: reliance mukesh Ambani s focus on local bond sell rs 15000 crore a strong planning expansion of business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.