आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी सध्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये व्यस्त आहेत. मुंबईतील जिओ पार्कमध्ये बांधलेल्या या कल्चरल सेंटरच्या उद्घाटन समारंभात जगभरातील कलाकार, उद्योगपती, प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. या उद्घाटन सोहळ्याला अंबानींचे संपूर्ण कुटुंब पोहोचले होते. कार्यक्रमादरम्यान मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि अंबानी कुटुंबातील धाकटी सून राधिका मर्चंट यांनी एंट्री घेतली, तेव्हा सर्वांच्या नजरा ज्युनियर अंबानींच्या हातावर खिळल्या. अनंत अंबानी यांच्या लग्झरी घड्याळाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या घड्याळाची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
सुपर लक्झरी घड्याळ
NMACC च्या दुसऱ्या दिवशी अनंत अंबानी ब्लॅक आऊटफिटमध्ये आले. त्यांच्या हातात एक दुर्मिळ आलिशान घड्याळ होतं, ज्याची किंमत ऐकून नक्कीच तुम्हाला चक्कर येईल. अनंत अंबानी यांनी Patek Philippe ब्रँडचं सुपर लक्झरी घड्याळ घातलं होतं. या घड्याळाची किंमत तब्बल १८ कोटी रुपये आहे.
अनंत अंबानी यांनी ग्रँडमास्टर चाइम वॉच एडिशन घातले होते, ज्याची किंमत १८ कोटी रुपये आहे. तुम्ही दिल्ली-एनसीआरमध्ये १८ कोटी रुपयांमध्ये व्हिला खरेदी करू शकता. तर मुंबईत तुम्हाला समुद्रकिनाऱ्या जवळही एखादं लक्झकी सी फेसिंग घर घेऊ शकता. Patek Philippe जगातील लक्झरी घड्याळं तयार करते. इतकंच नाही तर घड्याळांशिवाय अनंत अंबानी यांना कार्सचीदेखील आवड आहे.