Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिलायन्सला केवळ 3 महिन्यात 9516 कोटींचा निव्वळ नफा

रिलायन्सला केवळ 3 महिन्यात 9516 कोटींचा निव्वळ नफा

मुकेश अंबानींच्या रिलायन्स उद्योग समुहाला गतवर्षी याच तिमाहीत कंपनीला 8109 कोटींचा निव्वळ नफा झाला होता. सध्याच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 12:59 PM2018-10-18T12:59:05+5:302018-10-18T12:59:43+5:30

मुकेश अंबानींच्या रिलायन्स उद्योग समुहाला गतवर्षी याच तिमाहीत कंपनीला 8109 कोटींचा निव्वळ नफा झाला होता. सध्याच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला

Reliance posts record rs 9516 crore profit in quarter 2 | रिलायन्सला केवळ 3 महिन्यात 9516 कोटींचा निव्वळ नफा

रिलायन्सला केवळ 3 महिन्यात 9516 कोटींचा निव्वळ नफा

मुंबई - रिलायन्स उद्योग समुहाच्या चालू आर्थिक वर्षाच्या द्वितीय तिमाहीत कंपनीला 9516 कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. आजपर्यंतच्या तिमाहीत कंपनीला मिळालेला हा सर्वाधिक फायदा आहे. गतवर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या कालावधीच्या तुलनेत यंदा कंपनीला 17.4 टक्के नफा झाला आहे. जिओच्या एंट्रीनंतर रिलायन्सच्या आर्थिक नफ्यात वाढ होताना दिसत आहे.

मुकेश अंबानींच्या रिलायन्स उद्योग समुहाला गतवर्षी याच तिमाहीत कंपनीला 8109 कोटींचा निव्वळ नफा झाला होता. सध्याच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीला 9459 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी याबद्दल समाधान व्यक्त करताना, कंपनीने उत्कृष्ट काम केल्याचं म्हटलं आहे. रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योगात कंपनीला मोठा आर्थिक फायदा झाल्याचेही अंबानी यांनी म्हटले. दरम्यान, बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजने हॅथवे केबल आणि डेन नेटवर्क यांच्याशी भागिदारी करणार असल्याचीही घोषणा केली. या दोन्ही कंपनीत रिलायन्सकडून 25 टक्के भागिदारी करण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे.  
 

Web Title: Reliance posts record rs 9516 crore profit in quarter 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.