Join us

आता मुकेश अंबानी तुमचे सौंदर्य वाढवणार, लवकरच लाँच होणार ब्युटी अ‍ॅप! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2023 3:10 PM

रिलायन्स आता ब्युटी रिटेल मार्केटमध्ये उतरून मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्ली : आता प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या ग्राहकांचे सौंदर्य वाढवणार आहेत. येत्या काही आठवड्यांमध्ये रिलायन्स रिटेलचे (Reliance Retail) ब्युटी अ‍ॅप टिरा (Beauty App Tira) जगभरातील सर्व ग्राहकांसाठी लाइव्ह होणार आहे. त्वचेची निगा आणि कॉस्मेटिक प्रोडक्ट्स विकणारी टिरा ब्रँडची स्टोअरही सुरू होणार आहेत. पहिले स्टोअर एप्रिलमध्ये मुंबईत उघडण्याची शक्यता आहे. दरम्यान, रिलायन्स रिटेलने याआधी टिरा अॅप केवळ आपल्या कर्मचाऱ्यांसाठी लाइव्ह केले होते, जेणेकरून अ‍ॅपची योग्य प्रकारे टेस्टिंग करता येईल.

रिलायन्स आता ब्युटी रिटेल मार्केटमध्ये उतरून मोठ्या कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत आहे. या सेक्टरमध्ये दीर्घकाळ संघटित रिटेल चेनचा अभाव होता, तर दुसरीकडे ग्राहकही अशा प्रोडक्ट्सची विक्री करणाऱ्या दुकानांचा मोह सोडून देत होते. मात्र, आता काही गोष्टी बदलत आहेत. ब्युटी आणि पर्सनल केअर प्रोडक्ट्सच्या मागणीत झालेली वाढ आणि ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल विक्रीत झालेल्या वाढीमुळे बाजारपेठेत पुनरुज्जीवन झाले आहे. अंदाजानुसार, देशातील ब्युटी आणि पर्सनल केअर मार्केट 2025 पर्यंत 2.2 ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

पहिल्यांदा अ‍ॅप नंतर स्टोअरआम्ही कर्मचार्‍यांसाठी टिरा लाँच केली आहे, जी tirabeauty.com नावाची साइट आहे. ही साइट लवकरच ग्राहकांसाठी ओपन होईल, असे रिलायन्स रिटेल लिमिटेडचे ​​एमडी सुब्रमण्यम व्ही. यांनी सोमवारी राजधानी दिल्लीत उद्योग संस्था फिक्कीद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर सांगितले. तसेच, पहिले स्टोअर मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीला मुंबईत सुरू होईल, असेही सुब्रमण्यम व्ही. यांनी सांगितले आहे. 

टिरामध्ये असतील प्रीमियम प्रोडक्ट्सटिराचे अधिकाधिक प्रीमियम ब्रँड असतील, तर ब्युटी प्रॉडक्ट्सची मोठ्या प्रमाणावर पूर्तता करण्यासाठी आणखी एका कॉन्सेप्टवरही काम केले जाऊ शकते. सुब्रमण्यम व्ही. म्हणाले की, टिरा हा त्याचा प्रीमियम भाग असेल, नॉन-प्रिमियम भाग, आपल्या सध्या निश्चित करावा लागेल. दरम्यान, रिलायन्स रिटेल डिपार्टमेंटल स्‍टोअर चेनच्‍या माध्‍यमातून ब्युटी आणि पर्सनल केअर प्रोडक्‍टची रिटेल विक्री करत आहे. मात्र, डेडिकेटिड ब्युटी स्टोअर कॉन्सेप्ट कंपनीच्या रिटेल पोर्टफोलिओमधील ग्रोसरी, फॅशन आणि लाइफस्टाइल, शूज, इलेक्ट्रॉनिक्स, मेडिसिन आणि डॉमेस्टिक गुड्स यामधील अंतर भरून काढेल.

सर्व कंपन्या होत आहेत अॅक्टिव्हकंपनी कमी किमतीच्या लिपस्टिकपासून ते महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्सला विकण्यासाठी सर्व प्राइस पॉइंट्सवर अनेक कंझ्युमर सेगमेंटला टॅप करण्याचा विचार करत आहे. ब्युटी रिटेल कॉन्सेप्ट भारतभर नेण्यासाठी आमच्याकडे पुरेशी स्टोअर्स असतील, असे सुब्रमण्यम व्ही. म्हणाले. अलीकडे Myntra, Nykaa आणि अगदी Tata Group सारख्या कंपन्या ब्युटी मार्टेकमध्ये अधिक सक्रिय होत आहेत. कारण, भारतात अशा प्रोडक्ट्सची पोहोच अजूनही कमी आहे.

देशात 17,225 स्टोअर्स रिलायन्स रिटेल ही रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची उपकंपनी आहे, जी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अंतर्गत सर्व रिटेल व्यवसायांसाठी होल्डिंग कंपनी आहे. आरआरव्हीएल आपल्या उपकंपन्या आणि सहयोगींच्या माध्यमातून ग्रोसरी, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि लाइफस्टाइल आणि फार्मामधील 17,225 स्टोअर्स आणि डिजिटल कॉमर्स प्लॅटफॉर्मचे इंटिग्रेटिड ओम्नी-चॅनल नेटवर्क चालवते. आरआरव्हीएलने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या वर्षात 199,704 कोटी रुपयांची कंसोलिडेटिड उलाढाल आणि 7,055 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.

टॅग्स :रिलायन्सव्यवसायमुकेश अंबानी