देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडने बंपर कमाई केली आहे. एका अंदाजानुसार मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स आणि त्यांचा कंझ्युमर सेगमेंट्स जियो (Jio) आणि रिलायन्स रिटेल यांचे निकाल सकारात्मक राहिले आहेत. रिलायन्सच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंसोलिडेटेड रेव्हेन्यू २४८,१६० कोटी एवढा राहिला आहे. हे दर वर्षाच्या आधारावर ३.२ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीने आपल्या सर्व व्यवसायांमध्ये वाढीसह रिलायन्सचं तिमाहीतील उत्पन्न ४४,६७८ कोटी रुपये रुपये एवढं राहिलं आहे. ते दरवर्षीच्या १६.७ टक्क्यांनी अधिक आहे. करानंतरही रिलायन्सचं कंसॉलिडेड प्रॉफिट हे १९ हजार ६४१ कोटी एवढं होतं. हा नफा दरवर्षीच्या आधारावर १०.९ टक्क्यांनी अधिक आहे. डिसेंबर २०२३ च्या तिमाहीसाठी भांडवली व्यय ३० हजार १०२ कोटी एवढं होतं. त्यामध्ये संपूर्ण देशामध्ये ५जी रोल-आऊट, रिटेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तार आणि नव्या सोलर बिझनेसमधील गुंतवणुकीचा समावेश आहे. आयआरएलचं कंसॉलिडेड नेट लोक ११९३७२ कोटी रुपये होता. जो वार्षिक ईबीआयटीडीएच्या केवळ ६७ टक्के एवढं आहे.
मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जियोने डिसेंबर तिमाहीची आकडेवारी आज जाहीर केली. कंपनीच्या नफ्यामध्ये १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा १२.२ टक्क्यांनी वाढून ५ हजार २०८ कोटी रुपये एवढा झाला आहे. तसेच महसुलामध्ये १० टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या तिमाहीसाठी ऑपरेटिंग मार्जिन एक वर्षापूर्वी २६.६ टक्क्यांनी घटून २६.३ टक्क्यांवर आला आहे. तसेच कंपनींचा नेटवर्क ऑपरेटिंग खर्च एक वर्षापूर्वी ७ हजार २२७ कोटी रुपयांनी वाढून ७७०६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या तिमाहीदरम्यान कंपनीचा एकूण खर्च एक वर्षापूर्वीच्या १६ हजार ८३९ कोटी रुपयांवरून १८ हजार ५१८ कोटी रुपये झाला आहे. रिलायन्स रिटेलने ८३, ०६३ कोटी रुपयांचं रेकॉर्ड उच्च तिमाही महसूल जमा केला आहे. हा महसूल किराणा, फॅशन आणि लाइफस्टाईल आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायांच्या नेतृत्वामध्ये दरवर्षीच्या आधारावर २२.८ टक्के अधिक आहे.
दरम्यान, रिलायन्स कंपनीच्या शेअर्समध्ये आज तेजी दिसून आली. रिलायन्सचे शेअर आज वाढीसह बंद झाले. रिलायन्सचे शेअर आज हिरव्या निशाणीसह २,७३६.४५ सह बंद झाले. तर जियो फायनान्स सर्व्हिससह शेअरमध्येही आज वाढ दिसून आली. जियो फायनान्स सर्व्हिसचे शेअर आज तीन आकड्यांच्या वाढीसह २४६.५० रुपयांवर बंद झाला. कंपनीने तिमाहीत केलेल्या चांगल्या कामगिरीचा प्रभाव कंपनीच्या समभागांवरही दिसून येऊ शकतो. तसेच कंपनीच्या शेअरमध्ये आणखी वाढ होऊ शकते.