Join us  

जबरदस्त! अंबानींच्या मुलांचाही व्यवसायात डंका, आकाश अन् ईशा यांनी सांभाळली 'या' कंपनीची कमान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 2:50 PM

मार्च तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीजने मजबूत नफा नोंदवला आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या मार्च तिमाहीत विक्रमी नफा नोंदवला आहे. चौथ्या तिमाहीत कंपनीने १९,२९९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावल्याचे अहवालात सांगितले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत त्याचा नफा १६,२०३ कोटी रुपये होता. कंपनीचा महसूल दोन टक्क्यांनी वाढून २.१६ लाख कोटी रुपये झाला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ही बाजार भांडवलच्या दृष्टीने भारतातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. रिलायन्सच्या ग्राहक व्यवसायातील सततच्या वाढीमुळे महसुलाला आधार मिळाला आहे. रिलायन्स जिओ आणि रिटेलने या तिमाहीत चमकदार कामगिरी केली आहे.

रिलायन्स जिओने मार्च तिमाहीत नफ्यात वार्षिक १३ टक्क्यांनी वाढ नोंदवली असून, त्याचा निव्वळ नफा ४,७१६ कोटी रुपयांवर नेला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत जिओचा नफा ४,१७३ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या शेवटच्या तिमाहीत जिओचा महसूल २३,३९४ कोटी रुपये होता. रिलायन्स जिओची कमान मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीच्या हाती आहे.

Weekly Gold Price: आनंदाची बातमी! सोनं-चांदी अचानक इतके स्वस्त झालं! २४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले की, जिओने एक प्रमुख भूमिका बजावत देशभरात वेगाने 5G आणले आहे. Jio च्या 5G सेवांनी ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत आणि हे Jio नेटवर्कवरील ग्राहकांवरुन स्पष्टपणे दिसून येते. डिजिटल सोसायटी मजबूत करण्यासाठी आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत. जून २०२२ मध्ये आकाश अंबानी यांना रिलायन्स जिओ इनफोकॉमच्या अध्यक्षपद दिले होते.

मार्च तिमाहीत रिलायन्सचा रिटेलचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक १२.९ टक्क्यांनी वाढून २४१५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा एकूण महसूल १९.४ टक्क्यांनी वाढून ६९,२८८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत रिलायन्स रिटेलचा महसूल ५८,०१७ कोटी रुपये होता. वार्षिक आधारावर, रिलायन्स रिटेलचा EBITDA ३२.६ टक्क्यांनी वाढून ४,९१४ कोटी रुपये झाला आणि EBITDA मार्जिन ७.१ टक्के होता. रिलायन्स रिटेलने चौथ्या तिमाहीत ९६६ नवीन स्टोअर उघडले आहेत, यामुळे कंपनीच्या एकूण स्टोअर्सची संख्या १८,०४० झाली आहे. रिलायन्स रिटेलने या तिमाहीत सर्व फॉरमॅटमध्ये २१ कोटी ९० लाख पेक्षा जास्त वाटचाल नोंदवली.

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी यांनी तिमाही अहवालावर सांगितले की, रिलायन्स रिटेलने वर्षानुवर्षे मोठी वाढ केली आहे. रिलायन्स रिटेल आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत सर्वोत्तम उत्पादने देत आहे. आम्ही व्यवसाय पुढे नेत आहोत. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून आमची धोरणे बनवली जातात.  ईशा अंबानी ऑक्टोबर २०१४ पासून रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या बोर्डाचा एक भाग आहेत.

टॅग्स :रिलायन्सरिलायन्स जिओमुकेश अंबानी