Join us

लॉकडाऊनमध्ये जिओनं १.०४ लाख कोटी जमवले, राइट इश्यूतून ५३ हजार कोटी कमावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 1:33 PM

रिलायन्सनं लॉकडाऊनच्या या वातावरणातही 50 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे जमा केले आहेत. 

नवी दिल्लीः देशात कोरोनाचं संक्रमण असल्यानं लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे बहुतेक उद्योगधंदे ठप्प आहेत. पण कोरोनाच्या काळातही मुकेश अंबानींचीरिलायन्स जिओ कंपनी मोठ्या प्रमाणात उसळी घेत आहे. 22 एप्रिलपासून जिओ प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत 10 मोठे करार करण्यात आले आहेत. रिलायन्स जिओनं या करारांमधून एकूण 104,326.95 कोटी रुपये जमा केले आहेत. त्याशिवाय लॉकडाऊनदरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं राइट्स इश्यूचीही घोषणा केली होती. या राइट्स इश्यूच्या माध्यमातून कंपनीने 53,124.20 कोटी रुपये जमा केले आहेत. याला गुंतवणूकदारांचा जिओवर असलेला विश्वास म्हटले जाईल, कारण रिलायन्सनं लॉकडाऊनच्या या वातावरणातही 50 हजार कोटींपेक्षा जास्त पैसे जमा केले आहेत. Jio प्लॅटफॉर्मचे 10 करार7 आठवड्यांत जिओ प्लॅटफॉर्मने 10 करार केले. या 10 सौद्यांसह रिलायन्सने एकूण 1,04,326.95 कोटी रुपयांची भागीदारी वाढविली आहे. एकूण 22.38% भागीदारी विकून कंपनीने ही रक्कम जमवली आहे. या सौद्यांमध्ये फेसबुक, सिल्व्हर लेक पार्टनर्स, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, केकेआर, एडीआयए, टीपीजी, जनरल अटलांटिक इत्यादी जगातील अनेक आघाडीच्या गुंतवणूकदार कंपन्यांचा समावेश आहे. या 10 सौद्यांसह रिलायन्सने आणखी एक विक्रम केला आहे. संपूर्ण जगातील कोणत्याही कंपनीसाठी सतत निधी जमा करणे हे सर्वात मोठं आव्हान आहे. जगभरात लॉकडाऊन चालू असताना सर्वत्र आर्थिक मंदी आहे, अशा वेळी आरआयएल हा विक्रम नोंदवला आहे, ही बाबही आश्चर्यचकित करणारी आहे.राइट इश्यूचा मुद्दालॉकडाऊनदरम्यान आरआयएलने आणखी एक धाडसी निर्णय घेतला. कंपनी 50 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या राइट इश्यूची घोषणा केली. कंपनीचा गुंतवणूकदारांवर विश्वास आहे आणि गुंतवणूकदारांनी तो पूर्णपणे पाळला आहे. केवळ लॉकडाऊनदरम्यान कंपनीनं 53,124.20 कोटी रुपये जमा केले आहेत. हा भारतातील सर्वात मोठा राइट इश्यू बनला आहे. 

हेही वाचा

बापरे! कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वीच महिलेवर अंत्यसंस्कार; 'एवढे' पॉझिटिव्ह तर तब्बल 350 कुटुंबांवर टांगती तलवार

कोरोनाची दोन नवीन लक्षणं; आरोग्य मंत्रालयानं अपडेट केली यादी... जाणून घ्या!

'या' कठीण काळात भगवद्गीतेमध्ये शोधा शक्ती अन् शांती : तुलसी गबार्ड

CoronaVirus News: लष्करातही कोरोनाचा शिरकाव; काश्मीरमध्ये CRPFचे 31 जवान संक्रमित

CoronaVirus : धोका वाढला! चीनमध्ये कोरोनाची 'दुसरी' लाट; बीजिंगमध्ये लॉकडाऊन

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स जिओ