Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुकेश अंबानींची मोठी तयारी! पेट्रोल-डिझेल स्वस्तात विकणार; जाणून घ्या सविस्तर

मुकेश अंबानींची मोठी तयारी! पेट्रोल-डिझेल स्वस्तात विकणार; जाणून घ्या सविस्तर

उद्योगपती मुकेश अंबानी देशात पेट्रोल स्वस्तात विकण्याची तयारी करत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 09:06 AM2024-01-24T09:06:14+5:302024-01-24T09:10:24+5:30

उद्योगपती मुकेश अंबानी देशात पेट्रोल स्वस्तात विकण्याची तयारी करत आहेत.

reliance ready to receive cheap crude oil from venezuela will bring petrol diesel price down after 3 years | मुकेश अंबानींची मोठी तयारी! पेट्रोल-डिझेल स्वस्तात विकणार; जाणून घ्या सविस्तर

मुकेश अंबानींची मोठी तयारी! पेट्रोल-डिझेल स्वस्तात विकणार; जाणून घ्या सविस्तर

देशात लोकसभा निवडणुका काही महिन्यातच होणार आहेत. या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. 
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काही दिवसातच अर्थसंकल्पही सादर होणार आहे. दरम्यान, देशातील उद्योगपती मुकेश अंबानी ३ वर्षांनंतर एक मोठे काम करणार आहेत, यामुळे देशवासियांना स्वस्त पेट्रोल आणि डिझेल मिळू शकते.

मागिल काही दिवसापासून देशात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत केंद्रीय पेट्रोल मंत्र्यांनीही स्पष्टीकरण दिले होते. पेट्रोल मंत्र्यांनी असं सांगितलं होतं की, ज्या देशांवर बंदी घालण्यात आलेली नाही अशा सर्व देशांकडून भारत कच्च्या तेलाची आयात करेल. त्यामुळे आता व्हेनेझुएलाहून भारतात कच्च्या तेल येऊ शकते. आता याची अपेक्षा ३ वर्षांनी वाढली आहे, कारण व्हेनेझुएलावर लादलेले आर्थिक निर्बंध २०१९ मध्ये उठवण्यात आले आहेत. कमोडिटी मार्केट अॅनालिटिक्स फर्म कॅप्लरच्या मते, व्हेनेझुएलाचे कच्चे तेल नोव्हेंबर २०२० मध्ये भारतात आले होते.

बंगालमध्ये पहाटे ईडीची कारवाई! टीएमसीचे नेते शाहजहान शेख यांच्या घरावर पुन्हा छापा

याबाबत आता रिलायन्सचे अध्यक्ष मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज या प्रकरणात थेट व्हेनेझुएलाशी व्यवहार करेल, हे डिसेंबर महिन्यात स्पष्ठ झाले होते. त्यानंतर कंपनीने कच्च्या तेलाचे ३ टँकर बुक केले होते, याची डिलिव्हरी जानेवारी २०२४ पासून सुरू होणार आहे. यापूर्वी देखील, रिलायन्स इंडस्ट्रीज व्यतिरिक्त, नायरा एनर्जी लिमिटेड नियमितपणे व्हेनेझुएलामधून कच्चे तेल आयात करत असे. यावेळी सरकारी तेल कंपन्याही व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची खरेदी करण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी देशात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होऊ शकते.

८ ते १० डॉलरच्या सवलतीत कच्चे तेल मिळण्याची अपेक्षा

आतापर्यंत भारत रशियाकडून कच्च्या तेलाची मोठ्या सवलतीत आयात करत होता. आता ही सवलत प्रति बॅरल फक्त २ डॉलरवर आली आहे. तर भारताला व्हेनेझुएलाकडून प्रति बॅरल ८ ते १० डॉलरच्या सवलतीत कच्चे तेल मिळण्याची अपेक्षा आहे. व्हेनेझुएला कच्च्या तेलाची निर्यात करणाऱ्या देशांची संघटना असलेल्या ओपेकचा सदस्य आहे.

व्हेनेझुएलातून स्वस्त तेल उपलब्ध झाल्यास बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खाली येतील आणि भारतीय रिफायनरींना त्याचा फायदा होईल. जे शेवटी देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्यास मदत करेल. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ८०% आयात करतो.

Web Title: reliance ready to receive cheap crude oil from venezuela will bring petrol diesel price down after 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.