Join us  

अंबानींना पुन्हा एकदा मिळाली KKR ची साथ, इन्व्हेस्टमेंट फर्मनं केली २०६९.५० कोटी रुपयांची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:03 AM

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पुन्हा एकदा मोठी गुंतवणूक आली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये पुन्हा एकदा मोठी गुंतवणूक आली आहे. जागतिक गुंतवणूक फर्म केकेआरनं (KKR) रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. केकेआरनं रिलायन्स रिटेलमध्ये २०६९.५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्समध्ये २० हजार कोटींहून अधिक गुंतवणूक करून, गुंतवणूक फर्म केकेआरनं रिलायन्स रिटेल व्हेंचर्समधील आपली भागीदारी १.१७ टक्क्यांवरून १.४२ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे. केकेआरसोबतच्या या करारानंतर, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स इक्विटी मूल्याच्या बाबतीत देशातील चौथी सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

केकेआरचे मुख्यालय न्यूयॉर्कमध्ये आहे. ही गुंतवणूक कंपनी तिच्या उपकंपनीमार्फत करणार आहे. केकेआरने अंबानींच्या या कंपनीत गुंतवणूक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही २०२० मध्ये केकेआरनं रिलायन्स रिटेलमध्ये ५५५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. आता कंपनीनं रिलायन्स रिटेलमध्ये आपली भागीदारी वाढवण्यासाठी अतिरिक्त २०६९.५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

ईशा अंबानींकडे धुरारिलायन्स रिटेलची धुरा ईशा अंबानी यांच्याकडे सोपवण्यात आलीये. कंपनी सातत्यानं आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. कंपनीनं नव्या धोरणांतर्गत परदेशी कंपन्यांशी हातमिळवणी केलीये. बाजारात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी रिलायन्स रिटेलनं अनेक कंपन्यांचं अधिग्रहण केलंय, तसंच अनेक कंपन्यांसोबत डीलही केली. रिलायन्स ग्रोसरी, कन्झुमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि लाईफस्टाईल, तसंच फार्मासह निरनिराळ्या सेममेंटमध्ये व्यवसाय करते. देशात त्यांचे जवळपास १८५०० स्टोर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानी