Join us  

Reliance Retail जस्ट डायलमध्ये खरेदी करणार ४०.९५ टक्के हिस्सा; ३४९७ कोटी रूपयांमध्ये झाला व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 1:44 PM

Reliance Retail Just Dial : रिलायन्स रिटेल या व्यवहारासाठी कंपनीला ३,४९७ कोटी रूपये देणार आहे. रिलायन्स रिटेलच्या या निर्णयामुळे ई-कॉमर्स मार्केटमध्ये रिलायन्स अधिक भक्कम होईल. 

ठळक मुद्दे रिलायन्स रिटेल या व्यवहारासाठी कंपनीला ३,४९७ कोटी रूपये देणार आहे.रिलायन्स रिटेलच्या या निर्णयामुळे ई-कॉमर्स मार्केटमध्ये रिलायन्स अधिक भक्कम होईल. 

Reliance Retail’s New deal : रिलायन्स रिटेल (Reliance Retail Ventures Ltd) जस्ट डायल (Just Dial) मध्ये ४०.९५ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. कंपनी शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. यासाठी रिलायन्स ३,४९७ कोटी रूपये देणार आहे. रिलायन्स रिटेलच्या या निर्णयानंतर तेजीनं वाढत असलेल्या ई कॉमर्स मार्केटमध्ये रिलायन्सची पकड अधिक मजबूत होईल. तसंच जस्ट डायलची उर्वरित हिस्सा म्हणजेच २६ टक्के हिस्स्यासाठी ओपन ऑफर आणली जाईल. 

रिलायन्सनं जस्ट डायलमध्ये केलेली गुंतवणूक ही त्यांच्या डिजिटल रणनितीचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. गेल्या काही कालावधीपासून रिलायन्स रिटेलनं आणखीही काही कंपन्यांमध्ये हिस्सा खरेदी केला होता. यामध्ये नेटमेड्स, अर्बन लॅडरसारख्या कंपन्यांचा समावेश होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेटची रिलायन्स रिटेल ही कंपनी Just Dial च्या २.१७ कोटी इक्विटी शेअर्ससाठी ओपन फॉर ऑलची घोषणा करेल. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार लवकरच ते ओपन फॉर ऑल आणण्यासाठी सार्वजनिक घोषणा रकरेल असं एका रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटल्याचं सेबीनं सांगितलं. 

जस्ट डायलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्हीव्हीएस मणी हे त्या पदावर काम करत राहमार आहे. ते कंपनीच्या पुढील टप्प्याच्या मदतीसाठी काम करत राहणार असल्याचं रिलायन्सनं म्हटलं आहे. रिलायन्स रिटेल आणि जस्ट डायलमध्ये होणारा हा व्यवसाय शेअर धारकांच्या मंजुरीवर अवलंबून असेल. जस्ट डायलचे २.१२ कोटी इक्विटी प्रिफरेन्शिअल अलॉटमेंमध्ये रिलायन्स रिटेलला मिळतील. कंपनीला ते शेअर्स १०२२.२५ रूपये प्रति शेअरच्या दरानं दिले जातील. 

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीगुंतवणूक