Join us

Mukesh Ambani : आता सलॉन बिझनेसमध्ये मुकेश अंबानी घेणार एन्ट्री, 'हा' आहे रिलायन्स रिटेलचा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 12:18 PM

मुकेश अंबानींची रिलायन्स रिटेल आता सलॉन व्यवसायात उतरणार आहे.

मुकेश अंबानींचीरिलायन्स रिटेल आता सलॉन व्यवसायात उतरणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार रिलायन्स चेन्नईस्थित नॅचरल्स सलॉन आणि स्पामधील सुमारे 49 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. रिलायन्स रिटेल 49 टक्के स्टेक विकत घेऊन एक जॉईंट व्हेन्चर तयार करू शकते.

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार अधिकार्‍यांच्या हवाल्याने म्हटले आहे की नॅचरल्स सलॉन आणि स्पाचे भारतात सुमारे 700 आउटलेट आहेत आणि रिलायन्सला हे चार-पाच पटींने वाढवण्याची इच्छा आहे. ही चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. नॅचरल सलॉन आणि स्पा चालवणारी कंपनी ग्रूम इंडिया सलॉन आणि स्पा आहे. कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरच्या लॅक्मे ब्रँड आणि एनरिचसह प्रादेशिक ब्रँडशी स्पर्धा आहे.

20 हजार कोटींचा व्यवसाय

भारतातील 20,000 कोटी रुपयांच्या सलॉन उद्योगाशी सुमारे 6.5 मिलियन लोक जोडले गेले आहेत. कोरोना महासाथीच्या दरम्यान हे सर्वात जास्त प्रभावित क्षेत्रांपैकी एक होते. कोविडचा प्रत्येक व्यवसायावर परिणाम झाला आणि सलून कदाचित सर्वात जास्त प्रभावित झाले. पण गेल्या सात महिन्यांपासून व्यवसाय मजबूत झाला आहे. तथापि, आम्ही भागभांडवल कमी करत आहोत परंतु याचं कारण कोविडमुळे नाही, अशी माहिती नॅचरल्स सलॉन अँड स्पा चे सीईओचे सीके कुमारवेल यांनी दिली.

रिलायन्स रिटेलच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. एका धोरणांच्या रुपात आम्ही मीडिया आणि अफवांवर प्रतिक्रिया देत नसल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानी