रिलायन्स इंडस्ट्रीजची रिटेल युनिट रिलायन्स रिटेल (Reliance Retail) या वर्षी FMCG व्यवसायात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. रिलायन्स रिटेलच्या संचालक ईशा अंबानी यांनी २९ ऑगस्ट रोजी रिलायन्सच्या ४५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही माहिती दिली. “यावर्षी रिलायन्स एफएमजीसी सेक्टरमध्ये पाऊल टाकण्यास सज्ज झालं आहे. याचं उद्दिष्ट्य प्रत्येक भारतीयाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करणं आणि उत्तम दर्जाची उत्पादनं देण्याचे आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली.
एफएमजीसी सेगमेंटमध्ये रिलायन्स रिटेलचा सामना या क्षेत्रातील दिग्गज कंपन्या एचयुएल, नेस्ले आणि ब्रिटानिया यांच्याशी होणार आहे. यामुळे सर्वांनाच केवळ रोजगारच नाही तर आपला व्यवसाय सुरू करण्यासही मदत मिळेल, असंही इशा अंबानी म्हणाल्या. याशिवाय कंपनी लवकरच लोकांनी तयार केलेल्या वस्तूंचं मार्केटिंगही सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
Reliance to launch FMCG business this year: Isha Ambani at AGM
— ANI Digital (@ani_digital) August 29, 2022
Read @ANI Story | https://t.co/GwJgfacQN7#IshaAmbani#MukeshAmbani#RelianceRetail#Retail#FMCG#RelianceAGMpic.twitter.com/JShl2fZJwK
Whatsapp द्वारे जिओ मार्टची शॉपिंग
यावेळी ईशा अंबानी यांनी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जिओ मार्टवर करता येणाऱ्या शॉपिंगच्या प्रक्रियेबद्दलही माहिती दिली. “व्हॉट्सअॅपद्वारे जिओ मार्टचा वापर करायचा असेल तर जिओ मार्ट स्मार्ट बॉटवर तुम्हाला केवळ हाय करावं लागेल. त्यानंतर जिओ मार्ट सुरू करण्यासाठी एक लिंक पाठवली जाईस. त्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल,” असं त्या म्हणाल्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण कॅटलॉग पाहायला मिळेल. तसंच यात कॅटेगरी आणि सब कॅटेगरीही दिसेल. या ठिकाणी निरनिराळ्या कॅटेगरी सर्च करण्याचा आणि कोणत्याही प्रोडक्टपर्यंत पोहोचण्याचा पर्यायही मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याद्वारेच तुम्ही पेमेंटही करू शकता आणि आपली ऑर्डरही ट्रॅक करू शकता असंही त्यांनी नमूद केलं.