Join us

फ्री मूव्ही तिकीट अन् बरंच काही; जाणून घ्या Reliance SBI Card चे फायदे...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 3:44 PM

SBI कार्ड आणि रिलायन्सने सोबत नवीन नवीन को-ब्रॅन्डेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे.

Reliance SBI Card : SBI कार्ड्स (SBI Card) आणि मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेल (Reliance Retail) ने सोबत मिळून नवीन को-ब्रॅन्डेड क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. या कार्डचे नाव 'रिलायन्सएसबीआय कार्ड' आहे. रिलायन्स एसबीआय कार्ड आणि रिलायन्स एसबीआय कार्ड प्राइम, अशा दोन प्रकारात कार्ड लॉन्च करण्यात आले आहे. रिलायन्सच्या कुठल्याही स्टोअरमध्ये य कार्डद्वारे पेमेंट केल्यावर तुम्हाला अनेक फायदे आणि रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. दोन्ही कार्ड्सवर वेगवेगळ्या ऑफर्सही उपलब्ध आहेत. 

ग्राहकांना विशेष लाभ देण्यासाठी आणि ग्राहकवर्ग वाढवण्यासाठी रिलायन्स रिटेल आणि एसबीआय कार्डने भागीदारी केली आहे. या भागीदारी अंतर्गत, रिलायन्स रिटेल ग्राहक एसबीआय कार्डच्या विस्तृत नेटवर्कचा लाभ घेऊ शकतात, ज्यामुळे त्यांना ट्रॅव्हल आणि मनोरंजनसह इतर अनेक क्षेत्रात लाभ मिळतील.

रिलायन्स एसबीआय कार्ड चार्जेसरिलायन्स एसबीआय कार्डची जॉइनिंग फी 499 रुपये आहे, ज्यामध्ये इतर कुठलाही कर समाविष्ट नाही. पण, वार्षिक शुल्क 499 रुपये + कर आहे. 1 लाख रुपये खर्च केल्यास वार्षिक शुल्क माफ होईल. ऑपनिंग ऑफर अंतर्गत तुम्हाला 500 रुपयांचे रिलायन्स रिटेल व्हाउचर मिळेल. रिलायन्स ब्रँडसाठी 3200 रुपयांचे डिस्काउंट व्हाउचरही उपलब्ध असेल. या कार्डसह लाउंज फायदे उपलब्ध नाहीत.

रिलायन्स एसबीआय कार्ड प्राइम चार्जेसरिलायन्स एसबीआय कार्ड प्राइमची जॉइनिंग फी रु 2999 + कर आहे. याशिवाय वार्षिक शुल्कही तेवढेच आहे. 3 लाख रुपये खर्च केल्यानंतर वार्षिक शुल्क माफ केले जाईल. ओपनिंग ऑफर अंतर्गत तुम्हाला 3000 रुपयांचे रिलायन्स रिटेल व्हाउचर मिळेल. 11,999 रुपयांचे डिस्काउंट व्हाउचर विविध रिलायन्स ब्रँडसाठी उपलब्ध असतील. या कार्डवर 8 देशांतर्गत आणि 4 आंतरराष्ट्रीय विमानतळांचे लाउंज फायदे मिळतील. दर महिन्याला 250 रुपये किमतीचे चित्रपटाचे तिकिटही मोफत मिळेल.

टॅग्स :एसबीआयरिलायन्समुकेश अंबानीजिओबँकिंग क्षेत्रबँक