रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणखी एक डील करण्याच्या तयारीत आहेत. रिलायन्स बँड्स बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा चाईल्ड वेअर ब्रँड Ed-a-Mamma खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. ही डील ३००-३५० कोटी रुपयांना होऊ शकते. दोन इंडस्ट्री एक्झिक्युटीव्हनं यासंदर्भातील माहिती दिलीये. रिलायन्स ब्रँड्स रिलायन्स रिटेल व्हेन्चर्सची सहाय्यक कंपनी आहे.
रिलायन्स बँड्रस (Reliance Brands) आणि Ed-a-Mamma यांच्यादरम्यान सुरू असलेल्या चर्चा अखेरच्या टप्प्यात असल्याची माहिती समोर आलीये. येत्या ७ ते १० दिवसांमध्ये यासंदर्भातील करार होऊ शकतो. या प्रकरणाची माहिती असलेल्या जाणकारांच्या हवाल्यानं इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय. जर ही डील झाली तर रिलायन्स रिटेलचा किड्सवेअर पोर्टफोलिओ अधिक मजबूत होणार आहे.
Ed-a-Mamma कंपनीचं मूल्य १५० कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. ही कंपनी प्रामुख्यानं प्रोडक्ट्सची ऑनलाइन विक्री करते. Ed-a-Mamma ची सुरुवात २०२० मध्ये झाली होती. चिल्ड्रन वेअर, टीन्स वेअर आणि मॅटर्निटी वेअरचं उत्पादन आणि विक्री ही कंपनी करते. कंपनी आपले प्रोडक्ट्स ऑनलाइन, लाईफस्टाईल आणि शॉपर्स स्टॉपसारख्या ऑऊटलेट्स मध्ये विकते. ब्रँडची सुरुवात किड्सवेअर सोबत झाली होती आणि कंपनीनं ४-१२ वर्षीय मुलांना टार्गेट केलं होतं. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीनं इन्फंट्ससाठीही कपड्यांची रेंज लाँचकेली होती. सोबतच मुलींसाठी स्लिपसूट, बॉडीसूट आणि ड्रेसेस लाँच केले होते.