Join us  

रिलायन्सचे शेअर्स नव्या उच्चांकी स्तरावर; गोल्डमॅन सॅक्स, ICICI सिक्युरिटीजना आणखी तेजीची अपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 3:07 PM

गोल्डमॅन सॅक्सनं रिलायन्स इंडस्ट्रीजसाठीचं 12 महिन्यांचं टार्गेट वाढवलं आहे.

RIL share price : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) मागील सत्रांमधील तेजी कायम ठेवत ११ जानेवारी सरोजी कामकाजादरम्यान राष्ट्रीय शेअर बाजारावर 2,691.20 रुपयांच्या नवीन उच्चांकाला स्पर्श केला. ग्राहकांची वाढती संख्या, तांत्रिक व्यवसायातील तेजी तसंच ऑईल अँड केमिकल व्यवसायातील तेजी लक्षात घेऊन गोल्डमन सॅक्सने या शेअरवर ‘बाय’ रेटिंग कायम ठेवलं आहे. त्यानंतर या हेवीवेट स्टॉकमध्ये जोरदार वाढ दिसून आली.

2,885 रुपयांचं टार्गेटगोल्डमॅन सॅक्सनं आरआयएलसाठी 12 महिन्यांचं टार्गेट 2660 रुपयांवरुन वाढवून 2885 रुपये केलं आहे. यामुळे आर्थिक वर्ष 2024, आर्थिक वर्ष 2025 आणि आर्थिक वर्ष 2026 साठी EBITDA च्या अंदाजांमध्ये अनुक्रमे 2 टक्के, 3 टक्के आणि 4 टक्क्यांची कपात केली आहे. रिलायन्सच्या शेअरमध्ये गेल्या महिन्यात जवळपास 8.5 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. या काळात स्टॉक बेंचमार्क निफ्टीपेक्षा चांगली कामगिरी करताना दिसला. निफ्टीमध्ये या कालावधीदरम्यान 3 टक्क्यांची वाढ झाली आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीजला तेजीची अपेक्षा

देशांतर्गत ब्रोकरेज आयसीआयसीआय सिक्युरिटीजला मिड टर्ममध्ये हा स्टॉक 3050 रुपयांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. कोरोनादरम्यान आलेल्या घसरणीला सोडता या शेअरनं 2017 पासून बेस कायम ठेवला आहे. ब्रोकरेज हाऊसच्या म्हणण्यानुसा 10-डे EMA वर बनलेल्या बुलिश इंगल्फिंग कँडलिस्टिक पॅटर्ननं या स्टॉकमध्ये तेजी येण्याचे संकेत दिसत आहेत.

जेफरीजचंही बाय रेटिंगजेफरीजनं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरला 3125 रुपयांच्या टार्गेट प्राईजसह बाय रेटिंग दिलं आहे. आपल्या मागील रिपोर्टमध्ये ब्रोकरेजनं स्टॉकचं रेटिंग कायम ठेवत चांगल्या मूल्यांकनावर प्रकाश टाकला होता.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील ब्रोकरेजची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीशेअर बाजार