Lokmat Money > बिझनेस न्यूज > अवघ्या 72 तासात परिस्थिती बदलली; मुकेश अंबानी यांनी गमावले 39000 कोटी रुपये

अवघ्या 72 तासात परिस्थिती बदलली; मुकेश अंबानी यांनी गमावले 39000 कोटी रुपये

मंगळवारी देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 09:38 PM2024-01-23T21:38:45+5:302024-01-23T21:39:48+5:30

मंगळवारी देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले.

Reliance situation changed in just 72 hours; 39000 crores lost by Mukesh Ambani | अवघ्या 72 तासात परिस्थिती बदलली; मुकेश अंबानी यांनी गमावले 39000 कोटी रुपये

अवघ्या 72 तासात परिस्थिती बदलली; मुकेश अंबानी यांनी गमावले 39000 कोटी रुपये

Mukesh Ambani: शेअर बाजारासाठी मंगळवारचा दिवस वाईट ठरला. उच्चांक गाठल्यानंतर सेन्सेक्स 1600 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. यादरम्यान, एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली, तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक घसरले. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 18 लाख कोटी रुपयांहून कमी झाले.

रिलायन्सचे शेअर्स दोन टक्क्यांनी घसरले
मंगळवारी देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 2 टक्क्यांहून अधिक घसरले. कंपनीचा शेअर 2.11 टक्क्यांनी घसरून 2656 रुपयांवर आला. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा नीचांक 2,645 रुपये होता. महत्त्वाचे म्हणजे 15 जानेवारी रोजी कंपनीचे शेअर्स 2,792.65 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचले होते. तेव्हापासून कंपनीचे शेअर 136.65 रुपयांनी घसरले आहेत. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

39 हजार कोटी रुपयांचे नुकसान
या घसरणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 18 लाख कोटी रुपयांहून कमी झाले. बीएसईच्या आकडेवारीनुसार, आज कंपनीचे मार्केट कॅप 17,96,966.09 कोटी रुपये आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे मार्केट कॅप 18,35,665.82 कोटी रुपये होते. याचा अर्थ आज कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये 38,699.73 कोटी रुपयांची घट झाली आहे. गेल्या आठवड्याभरात कंपनीचे मार्केट कॅप 56,899.08 कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

Web Title: Reliance situation changed in just 72 hours; 39000 crores lost by Mukesh Ambani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.