Join us  

मोठी तयारी! अंबानी-टाटा एकत्र येणार, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ॲमेझॉनला टक्कर देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 3:48 PM

देशातील दोन मोठे उद्योग समुह एकत्र येत नेटफ्लिक्स, हॉटस्टार, ॲमेझॉनला टक्कर देणार आहेत.

देशातील सर्वात मोठे उद्योग समुह असणाऱ्या टाटा आणि रिलायन्स समुहाने मोठी तयारी सुरू केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी टाटा समूहासोबत एक उपक्रम सुरू करण्याचा विचार करत आहेत. मुकेश अंबानी मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. मुकेश अंबानी आणि टाटा एकत्र आल्याने नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि ॲमेझॉनला मोठा धक्का बसू शकतो. रिलायन्स इंडस्ट्रीज टाटा समूहाची कंपनी टाटा प्लेमधील २९.८ टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. टाटा प्ले ही सबस्क्रिप्शन आधारित सॅटेलाइट टीव्ही आणि व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवा आहे.

EPF Interest Rates: केव्हा खात्यात येणार व्याजाचे पैसे, आले की नाही - या ४ पद्धतींनी जाणून घ्या 

एका रिपोर्टनुसार, रिलायन्स वॉल्ट डिस्नेकडून हा स्टेक खरेदी करू शकते. यामुळे रिलायन्स टेलिव्हिजन वितरण क्षेत्रात आपले स्थान मजबूत करू शकते. याशिवाय, यामुळे रिलायन्सच्या OTT प्लॅटफॉर्म JioCinema ची पोहोच देखील वाढेल. टाटा प्लेने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सची टाटा प्लेमध्ये ५०.२ टक्के भागीदारी आहे. सिंगापूर फंड टेमासेकचा टाटा प्लेमध्ये २० टक्के हिस्सा आहे.

टाटा-रिलायन्स समुहाचा करार सुरू

टेमासेक टाटा प्लेमधील आपला हिस्सा टाटा समूहाला विकण्यासाठी बोलणी करत आहे. मात्र या प्रकरणी चर्चा पुढे गेलेली नाही. आता रिलायन्स आणि टाटा प्ले यांच्यातील करार निश्चित झाला तर टाटा समूह आणि रिलायन्स समूह यांच्यातील हा पहिलाच उपक्रम असेल. यामुळे रिलायन्सच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म JioCinema ला टाटा प्लेच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. जर हा करार झाला, तर रिलायन्सला त्याच्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म JioCinema चे संपूर्ण कंटेंट कॅटलॉग टाटा प्ले ग्राहकांना देऊ करायचे आहे.

बँकर्स सध्या टाटा प्लेमधील डिस्नेच्या स्टेकचे मूल्यमापन करत आहेत. टाटा प्लेची बाजारात चांगली पकड आहे पण नेटफ्लिक्स, हॉटस्टार, जिओसिनेमा आणि ॲमेझॉन प्राइम याचा सामना करावा लागत आहे. टाटा प्लेला गेल्या आर्थिक वर्षात १०५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीला ६८.६० कोटी रुपयांचा नफा झाला होता.

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सरतन टाटा