Join us  

रिलायन्सपासून टाटापर्यंत 9 कंपन्यांचे 1.22 लाख कोटींचे नुकसान; नेमकं कारण जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 1:20 PM

मागील आठवड्यात देशातील उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. देशातील टॉप 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांना सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मागील आठवड्यात देशातील उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. देशातील टॉप 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांना सुमारे 1.25 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबरच टाटा समूहाची सर्वात मोठी कंपनी टीसीएस आणि गौतम अदानी यांची अदानी एंटरप्रायझेस यांचाही तोटा होत असलेल्या कंपन्यांमध्ये समावेश आहे.

दुसरीकडे, HDFC बँकेला लाभ मिळाला आहे. गेल्या आठवड्यात, मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 843.86 अंकांनी किंवा 1.36 टक्क्यांनी घसरला. यामुळे आघाडीच्या 10 पैकी 9 कंपन्यांचे मार्केट कॅप संयुक्तपणे 1,22,092.9 कोटी रुपयांनी घसरले.

नोकरीत भागत नाही? बिझनेसचा विचार करताय? पैसे कसे उभे करणार? हे आहेत मार्ग....

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 29,767.66 कोटी रुपयांनी घटून 17,35,405.81 कोटी रुपये झाले. TCS ला त्ंयाच्या मार्केट कॅपमध्ये 19,960.12 कोटी रुपयांची घसरले. ICICI बँकेचे मूल्यांकन 19,722.3 कोटी रुपयांनी घसरून 6,29,380.54 कोटी रुपये झाले. इन्फोसिसचे मार्केट कॅप 19,567.57 कोटी रुपयांनी घसरून 6,40,617.19 कोटी रुपयांवर आले. हिंदुस्थान युनिलिव्हरचे मार्केट कॅप 11,935.92 कोटी रुपयांनी घसरून 6,27,434.85 कोटी रुपयांवर आले.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॅप 11,735.86 कोटी रुपयांनी घसरून 5,38,421.83 कोटी रुपये झाले. भारती एअरटेलचे मार्केट कॅप 7,204.38 कोटी रुपयांनी घसरून 4,57,325.46 कोटी रुपयांवर आले. अदानी एंटरप्रायझेसचे मार्केट कॅप 1,903.8 कोटी रुपयांनी घसरून 4,53,617.85 कोटी रुपये झाले.

एचडीएफसीचा एमकॅप 295.29 कोटी रुपयांनी घसरून 4,86,460.48 कोटी रुपयांवर आला. एचडीएफसी बँकेने 4,126.18 कोटी रुपये जोडले आणि त्याचे एमकॅप रुपये 9,13,726.29 कोटी झाले आहे.

टॅग्स :व्यवसायरिलायन्सअदानीअनिल अंबानी