विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्स समूहाने जगातील सर्वाधिक कल्पक (इनोव्हेटिव्ह) समूह बनण्याचा संकल्प सोडला असून त्यासाठी मिशन कुरुक्षेत्र (एम के) ही योजना आपल्या १,४३,००० कर्मचाऱ्यांसाठी सुरू केली आहे.
मिशन कुरुक्षेत्र
मिशन कुरुक्षेत्र ही तशी मुकेश अंबानींची संकल्पना आहे व ती सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वात अमलात येते आहे. डॉ. माशेलकर हे रिलायन्स समूहाचे इंडिपेंडन्ट डायरेक्टर आहेत. डॉ. माशेलकर यांचे सोबत केलॉग स्कूल आॅफ मॅनेजमेंटचे माजी डीन दीपक जैन आणि आयआयटी मुंबईचे माजी संचालक अशोक मिश्रा हे इंडिपेंडन्ट डायरेक्टर्सही या मिशन कुरुक्षेत्रच्या अंमलबजावणीत हातभार लावत आहेत.
मिशन कुरुक्षेत्रमध्ये कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या कामकाजाचे सूक्ष्म निरीक्षण करून त्यात कल्पक सुधारणा सुचवायच्या आहेत. या सुधारणांद्वारे कंपनीचे काम सुलभ होऊन उत्पादन खर्च कमी होऊन कंपनीचा नफा वाढायला हवा. या सूचनांचा अभ्यास करून त्यापैकी कुठली सुधारणा अमलात आणायची ते ठरविण्यासाठी रिलायन्स इनोव्हेशन कौन्सिलही स्थापन केले आहे.
मुकेश अंबानींची ही संकल्पना तशी २००८ मधील जागतिक मंदीनंतर साकार झाली आणि २०१४ साली ती पुनरुज्जीवित करण्यात आली. गेल्या तीन वर्षात कर्मचाऱ्यांनी जवळपास १८००० सूचना/ सुधारणा सुचविल्या व त्यापैकी ३४०० सूचना रिलायन्सने अमलात आणल्या आहेत अशी माहिती रिलायन्स इनोव्हेशन कौन्सिलचे सुशील बोर्डे यांनी दिली.
मिशन कुरुक्षेत्र अंतर्गत कल्पक सूचनेसाठी ‘कृष्ण अवॉर्ड’, जास्तीत जास्त सूचना देणाºया कर्मचाºयाला ‘कर्ण अवॉर्ड’ व सर्वात जास्त आर्थिक लाभ देणाºया कर्मचाºयाला ‘युक्ती अवॉर्ड’ देण्यात येते. याशिवाय ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’, ‘सेनापती अवॉर्ड’, ‘कॅम्पेन अवॉर्ड’, ‘धनंजय अवॉर्ड’ व ‘कल्पना सेना’ हे इतरही पुरस्कार आहेत.
मिशन कुरुक्षेत्र या योजनेत रिलायन्स समूहाच्या कोणत्याही कंपनीचा कर्मचारी समूहाच्या इतर कंपन्यांच्या कामकाजाबद्दल सूचना/ सुधारणा सुचवू शकतो. मिशन कुरुक्षेत्रमधील सूचनांच्या अंमलबजावणीमुळे रिलायन्स समूहाच्या नफ्यात २०१६-१७ साली तब्बल एक टक्क्याची वाढ झाली व नफा ३१४२५ कोटी रुपयावर पोहोचला.
गेल्या महिन्यात मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओसाठी जाहीर केलेल्या मोफत ४-जी या योजनेमुळे रिलायन्स समूहावर पैशांचा
वर्षाव होणार आहे व ग्राहकहीखूष होणार आहेत. यावरून मुकेश अंबानी यांना कशा प्रकारच्या कल्पक सूचना अपेक्षित आहेत त्याची झलक मिळते.
रिलायन्स होणार जगामधील सर्वात ‘कल्पक’ समूह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:05 AM2017-08-09T01:05:08+5:302017-08-09T01:05:35+5:30