Lokmat Money > बिझनेस न्यूज > CoronaVirus News: 'त्या' वाहनांना आता दररोज ५० लीटर डिझेल मिळणार मोफत; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

CoronaVirus News: 'त्या' वाहनांना आता दररोज ५० लीटर डिझेल मिळणार मोफत; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

CoronaVirus News: कोरोनाविरुद्धच्या लढ्यात रिलायन्स समूहाची मोठी घोषणा; देशभरात लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 01:15 PM2021-05-19T13:15:03+5:302021-05-19T13:15:27+5:30

CoronaVirus News: कोरोनाविरुद्धच्या लढ्यात रिलायन्स समूहाची मोठी घोषणा; देशभरात लागू होणार

Reliance Will Provide Free Diesel And Petrol Up To 50 Litres For Vehicles On Covid-19 Duty Daily | CoronaVirus News: 'त्या' वाहनांना आता दररोज ५० लीटर डिझेल मिळणार मोफत; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

CoronaVirus News: 'त्या' वाहनांना आता दररोज ५० लीटर डिझेल मिळणार मोफत; मुकेश अंबानींची मोठी घोषणा

मुंबई: देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दर दिवशी चार लाखांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आता हाच आकडा ३ लाखांच्या खाली आला आहे. मात्र दररोज ४ हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्यानं परिस्थिती गंभीर आहे. या स्थितीत उद्योगपती मुकेश अंबानी पुढे आले आहेत. 

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी रिलायन्स समूहानं आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आता रिलायन्स समूह त्यांच्या मालकीच्या सर्व पेट्रोल पंपांवर रुग्णवाहिकांना ५० लीटर डिझेल मोफत देणार आहे. रिलायन्सच्या पेट्रोल पंपांवर रुग्णवाहिकांना दररोज ५० लीटर डिझेल मोफत मिळेल. मात्र यासाठी एक अट आहे. मोफत डिझेल घेणारी रुग्णवाहिका सरकारी असायला हवी. देशभरात रिलायन्सचे जवळपास १५०० पेट्रोल पंप आहेत. या सर्व पेट्रोल पंपवर ही सुविधा उपलब्ध असेल.

अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या मार्गावर, चिनी अब्जाधिशाला टाकलं मागे

रिलायन्सच्या पेट्रोल पंपवर सरकारी रुग्णवाहिकांना ३० जूनपर्यंत मोफत डिझेल मिळेल. गेल्या काही दिवसांत इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे कोरोना संकटात सुरू असलेल्या मदतकार्यात कोणतीही बाधा येऊ नये यासाठी रिलायन्सनं हा निर्णय घेतला आहे. 'कोरोना संकटाचा सामना करताना केंद्र सरकार महत्त्वाची पावलं उचलत आहे. या महामारीशी दोन हात करण्यासाठी रुग्णवाहिकांना आम्ही डिझेल मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारी खर्च वाचेल. पैशांची बचत होईल,' असं रिलायन्सनं म्हटलं आहे.

Web Title: Reliance Will Provide Free Diesel And Petrol Up To 50 Litres For Vehicles On Covid-19 Duty Daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.