Join us  

रिलायन्सचा ४जी फोन दीड हजारांत

By admin | Published: January 13, 2017 12:36 AM

रिलायन्स कंपनी आता लवकरच मोफत कॉलिंग असलेला फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स कंपनी आता लवकरच मोफत कॉलिंग असलेला फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे या एलटीई वाल्ट फिचर असलेल्या फोनची किंमत १५00 रुपयांच्या आत असेल. या फोनविषयी बाजारात आणि ग्राहकांत प्रचंड उत्सुकता दिसत आहे.सप्टेंबरमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने ४ जी मोफत डेटाची आॅफर जाहीर केली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता रिलायन्सने जिओची हीच आॅफर ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी तीन महिने म्हणजेच मार्चपर्यंत वाढवून दिली आहे. त्याआधीच हा नवा मोबाइल बाजारात आणण्याच्या दृष्टीने कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत.रिलायन्स जिओनं हा फोन बाजारात आणल्यास ग्राहक मोठ्या प्रमाणात त्याकडे वळतील, असे दिसते. साधारणपणे ९९९ ते १५00 रुपयांच्या आसपास या फोनची किंमत असू शकेल, असे सांगण्यात येत आहे. अशा प्रकारचा फोन २00१ मध्ये रिलायन्सने लाँच केला होता आणि ग्राहकांच्या त्यावर अक्षरश: उड्या पडल्या होत्या.रिलायन्स जिओच्या वॉल्ट फिचर असलेल्या या मोबाइल फोनमध्ये  फ्रंट कॅमेरा असून, असंख्य अ‍ॅप्लिकेशन्स त्यात असतील. या फोनमध्ये जिओ चॅट, लाइव्ह  टीव्ही आणि व्हिडीओसारखी फिचर्स मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. कंपनी या फोनमध्ये डिजिटल वॉलेट सुविधा, जिओ  मनी वॉलेट सुविधाही देणार असल्याचीही चर्चा आहे. अनेक अ‍ॅप्लिकेशन्स असलेल्या या फोनची किंमत इतर ४जी मोबाइलच्या  तुलनेत सर्वात कमी असल्याचे बोलले जाते. (लोकमत न्यूज नेटवर्क)100 कोटी भारतीय मोबाइलधारकांपैकी सुमारे ६५ टक्के लोकांकडे अजूनही साधे फोन आहेत. ज्यांच्या किंमती ९०० ते दोन हजार रुपयांपर्यंत आहेत. सर्वात स्वस्त ४ जी फोन हा सध्या बाजारामध्ये ३ हजार रुपयांना मिळतो. त्यामुळे अनेक मोबाइलधारक अजूनही इंटरनेटच्या जलद स्पीडपासून दूर आहेत.