Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिलासा : ताटातील डाळ-चपाती स्वस्त, घाऊक महागाई १.३४%, २९ महिन्यांचा नीचांक

दिलासा : ताटातील डाळ-चपाती स्वस्त, घाऊक महागाई १.३४%, २९ महिन्यांचा नीचांक

Business:

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 06:29 AM2023-04-18T06:29:07+5:302023-04-18T06:29:24+5:30

Business:

Relief : Cheap dal-chapati on the plate | दिलासा : ताटातील डाळ-चपाती स्वस्त, घाऊक महागाई १.३४%, २९ महिन्यांचा नीचांक

दिलासा : ताटातील डाळ-चपाती स्वस्त, घाऊक महागाई १.३४%, २९ महिन्यांचा नीचांक

 नवी दिल्ली : घाऊक क्षेत्रातील महागाईचा (डब्ल्यूपीआय) दर मार्चमध्ये घटून १.३४% झाला असून, हा महागाईचा २९ महिन्यांतील नीचांक ठरला आहे. सरकारने महागाईचे आकडे जाहीर केले. गहू, डाळी व इंधन यांसारख्या वस्तूंच्या किमतींत घसरण झाल्यामुळे महागाईचा दर खाली आला. दुधाची महागाई वाढली आहे. 

या घटकांमुळे कमी झाली महागाई
n ऑक्टोबर, २०२० मध्ये घाऊक महागाईचा दर १.३१ टक्के होता. मागील सलग १० महिन्यांपासून महागाई घसरत आहे. 
n मागील सोमवारी किरकोळ क्षेत्रातील महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, मार्च, २०२३ मध्ये किरकोळ महागाई घटून ५.६६ टक्के झाली आहे. 
n मार्च, २०२३ मध्ये खाद्यवस्तूंसह टेक्स्टाइल्स, मिनरल्स, रबर आणि प्लास्टीक उत्पादनांच्या किमती खाली आल्या आहेत. 
n कच्चे तेल, नैसर्गिक वायू, कागद आणि कागदी उत्पादने यांच्या किमतीही उतरल्या आहेत. 

अशी झाली घसरण
फेब्रुवारीमध्ये खाद्यवस्तूंचा घाऊक महागाई दर २.७६ टक्के होता, मार्चमध्ये तो २.३२% झाला.
मार्चमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंची महागाई ३.२८ टक्क्यांवरून घटून २.४० टक्के झाली.
इंधन व वीज 
फेब्रुवारी २०२३     १४.८२%
मार्च २०२३        ८.९६%
गव्हाची महागाई 
मार्च २०२३      ९.१६% 
मार्च २०२२     १४.०४%
कारखाना उत्पादनांची  घाऊक महागाई १.९४%वरून उतरून निगेटिव्ह झोनमध्ये गेली. डाळींची महागाई ३.०३% आहे.

आता लक्ष मान्सूनकडे
n घाऊक महागाई दीर्घ कालावधीसाठी वाढलेली राहणे चिंताजनक ठरू शकते. याचा उत्पादन क्षेत्रांवर विपरीत परिणाम हाेताे. 
n सरकारने उत्पादन शुल्क कपात केल्यानंतर इंधनाचे दर कमी झाले. आता लक्ष मान्सूनवर असेल. चांगला मान्सून हा महागाईचा दर स्थिर ठेवण्यात मदत करेल.

 

Web Title: Relief : Cheap dal-chapati on the plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.