नवी दिल्ली : घाऊक क्षेत्रातील महागाईचा (डब्ल्यूपीआय) दर मार्चमध्ये घटून १.३४% झाला असून, हा महागाईचा २९ महिन्यांतील नीचांक ठरला आहे. सरकारने महागाईचे आकडे जाहीर केले. गहू, डाळी व इंधन यांसारख्या वस्तूंच्या किमतींत घसरण झाल्यामुळे महागाईचा दर खाली आला. दुधाची महागाई वाढली आहे.
या घटकांमुळे कमी झाली महागाईn ऑक्टोबर, २०२० मध्ये घाऊक महागाईचा दर १.३१ टक्के होता. मागील सलग १० महिन्यांपासून महागाई घसरत आहे. n मागील सोमवारी किरकोळ क्षेत्रातील महागाईची आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार, मार्च, २०२३ मध्ये किरकोळ महागाई घटून ५.६६ टक्के झाली आहे. n मार्च, २०२३ मध्ये खाद्यवस्तूंसह टेक्स्टाइल्स, मिनरल्स, रबर आणि प्लास्टीक उत्पादनांच्या किमती खाली आल्या आहेत. n कच्चे तेल, नैसर्गिक वायू, कागद आणि कागदी उत्पादने यांच्या किमतीही उतरल्या आहेत.
अशी झाली घसरणफेब्रुवारीमध्ये खाद्यवस्तूंचा घाऊक महागाई दर २.७६ टक्के होता, मार्चमध्ये तो २.३२% झाला.मार्चमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंची महागाई ३.२८ टक्क्यांवरून घटून २.४० टक्के झाली.इंधन व वीज फेब्रुवारी २०२३ १४.८२%मार्च २०२३ ८.९६%गव्हाची महागाई मार्च २०२३ ९.१६% मार्च २०२२ १४.०४%कारखाना उत्पादनांची घाऊक महागाई १.९४%वरून उतरून निगेटिव्ह झोनमध्ये गेली. डाळींची महागाई ३.०३% आहे.
आता लक्ष मान्सूनकडेn घाऊक महागाई दीर्घ कालावधीसाठी वाढलेली राहणे चिंताजनक ठरू शकते. याचा उत्पादन क्षेत्रांवर विपरीत परिणाम हाेताे. n सरकारने उत्पादन शुल्क कपात केल्यानंतर इंधनाचे दर कमी झाले. आता लक्ष मान्सूनवर असेल. चांगला मान्सून हा महागाईचा दर स्थिर ठेवण्यात मदत करेल.