दिवाळीपूर्वी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याची बातमी समोर आली होती. परंतु आता यावर दिलासा मिळाला आहे. इंधन कंपन्यांनी आज, गुरुवार, १६ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कंपन्यांकडून थोडा दिलासा देण्यात आला आहे. इंधन कंपन्यांनी (OMCs) कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५७.५० रुपयांची कपात केली आहे. नवे दर आजपासून लागू झाले आहेत.
दिवाळीपूर्वी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात १०१.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता.
काय आहेत नवे दर?
नवीन बदलानंतर, १९ किलोच्या सिलिंडरची किंमत दिल्लीत १७५५.५० रुपये, कोलकात्यात १८८५.५० रुपये, मुंबईत १७२८ रुपये आणि चेन्नईमध्ये १९४२ रुपये प्रति सिलिंडर झाली आहे.
घरगुती सिलिंडरचे दर काय?
घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये, मुंबईत ९०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपये प्रति सिलिंडर आहे.
दिवाळीनंतर एलपीजी सिलिंडरच्या दरात दिलासा, इंधन कंपन्यांनी केली कपात
दिवाळीपूर्वी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याची बातमी समोर आली होती. परंतु आता यावर दिलासा मिळाला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 01:45 PM2023-11-16T13:45:59+5:302023-11-16T13:53:05+5:30